ETV Bharat / sports

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हेच माझे लक्ष्य - राहुल आवारे - olympics medal

दिल्ली, हरियाणामध्ये ज्याप्रमाणे सरकार खेळाडूंना पाठबळ देते तसे पाठबळ महाराष्ट्रात देखील मिळावे, अशी अपेक्षा राहुल आवारेने बोलून दाखवली. आगामी ऑलिम्पिकची मी तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या ऑलिंपिकमध्ये संधी मिळाली नाही, तरी पुढील ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची मला आशा आहे, असेही राहुल म्हणाला.

राहुल आवारे
author img

By

Published : Sep 25, 2019, 8:52 PM IST

पुणे - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्यपदक पटकवल्यानंतर आता माझे लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे आहे. यासाठी मी सराव सुरू केला असल्याचे कुस्तीपटू राहुल आवारेने सांगितले. त्याचे मंगळवारी रात्री पुण्यात आगमन झाले. त्यानंतर आज बुधवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तो बोलत होता.

महाराष्ट्रात भरपूर गुणवत्ता आहे. मात्र, मातीतील कुस्तीमुळे या गुणवत्तेला चालना मिळत नाही. कोल्हापूर कुस्तीचे माहेरघर असले, तरी अकादमी अथवा सोयी-सुविधांचा अभाव असल्याने कुस्तीपटू पुण्यात सरावासाठी येत आहेत. यामुळे कोल्हापूरमध्ये सर्व सोयी-सुविधा युक्त असे कुस्तीचे मोठे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभे करायला हवे, असे मत त्याने व्यक्त केले.

पुण्यातील वार्तालाप कार्यक्रमात बोलताना राहुल आवारे...

हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : मराठमोळ्या राहुल आवारेने जिंकले कांस्यपदक

दिल्ली, हरियाणामध्ये ज्याप्रमाणे सरकार खेळाडूंना पाठबळ देते तसे पाठबळ महाराष्ट्रात देखील मिळावे, अशी अपेक्षा राहुल आवारेने बोलून दाखवली. आगामी ऑलिम्पिकची मी तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये संधी मिळाली नाही, तरी पुढील ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची मला आशा आहे, असेही राहुल म्हणाला.

दरम्यान, राहुल आवारेने नुकतेच कझाकिस्तानच्या नूर सुल्तानमध्ये पार पडलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. या स्पर्धेत राहुलने ६१ किलो वजनी गटात अमेरिकेचा टेलर ली ग्राफचा ११-४ ने पराभव करत कांस्यपदकाची कमाई केली.

हेही वाचा - बजरंगाची कमाल...! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Intro:ऑलम्पिक पदक मिळवणे हेच माझे उद्दिष्ट, कुस्तीपटू राहुल आवारेBody:mh_pun_03_ressller_rahul_aware_avb_7201348

anchor
जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्यानंतर आता माझे लक्ष्य ऑलिंपिक असून, त्यासाठी मी तयारी सुरू केली आहे. येत्या ऑलिंपिक स्पर्धेत संधी न मिळाल्यास पुढील ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याची आशा असेल, अशा भावना भारताचा कुस्तीपटू राहुल आवारे याने व्यक्त केल्या. जागतिक स्पर्धेत पदक मिळवल्यानंतर मंगळवारी रात्री राहुल आवारेचे पुण्यात आगमन झाले. त्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तो बोलत होता, महाराष्ट्रात
गुणवत्ता असूनही खेळाडू पुढे जात नाहीत कारण मातीतील कुस्तीला आजही भरपूर प्राधान्य आहे. दिल्ली, हरियाणामध्ये ज्याप्रमाणे सरकार खेळाडूंना पाठबळ देते, तसे आपल्या महाराष्ट्रातदेखील मिळावे अशी अपेक्षा त्याने यावेळी व्यक्त केली
तसेच कोल्हापूर कुस्तीचे माहेरघर असले, तरी ऍकॅडमी वा सोयी-सुविधांचा अभाव असल्याने मल्ल पुण्यात सरावासाठी येत असल्याची खंतही त्याने व्यक्त केली.कोल्हापूरमध्ये सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे कुस्तीचे मोठे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभे करायला हवे होते असे तो म्हणाला...आता मी ऑलिंपिकची तयारी सुरू केली आहे. येणाऱया ऑलिंपिकमध्ये संधी मिळाली नाही, तरी पुढील ऑलिंपिकमध्ये खेळण्याची मला आशा आहे असे राहुल ने यावेळी सांगितले
Byte राहुल आवारे, जागतिक ब्रॉंझ पदक विजेता कुस्तीपटूConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.