दुबई : सर्बियाचा टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच ( Novak Djokovic arrives in Dubai ) याचे दुबईत आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले आहे. दुबई एक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठीही तो आला आहे. नोव्हाक जोकोविचने कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याने त्याला ऑस्ट्रेलिया ओपन या स्पर्धेला मुकावे लागले होते. तो आता दुबईत ड्यूटी फ्री टेनिस चॅम्पियनशिपचा ( Duty Free Tennis Championship in Dubai ) भाग असणार आहे.
दुबई एक्स्पो-2020 ( Dubai Expo-2020 ) मध्ये सर्बियाच्या पॅव्हेलियनचाही दौरा केला. या दरम्यान त्याच्या बऱ्याच फॅनने त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. जोकोविचने चाहत्यांसोबत सेल्फी सुद्धा काढला. त्याच्या चॅरिटी नोव्हाक जोकोविच फाउंडेशनसाठी ( Novak Djokovic Foundation ) पॅव्हेलियनमध्ये एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. हे फाउंडेशन सर्बियामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी काम करते.
जगातील एक नंबरचा टेनिस खेळाडू जोकोविच काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की, तो कोरोना लसीकरणाच्या विरोधात नाही. तसेच त्याला लसीकरण करण्यास भाग पाडले तर त्याची किंमत मोजायला तो तयार आहे. भलेही त्याला ग्रँडस्लॅम स्पर्धा सोडावी लागली तरी ही चालेल. अलीकडेच त्याला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ( Australian Open Tournament ) सहभागी होऊ दिले नाही.