नवी दिल्ली: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा ( Olympic gold medalist Neeraj Chopra ) त्याचे प्रशिक्षण शिबिर तुर्कीतून हलवून गुरुवारी फिनलंडला जाणार आहे. नीरज सध्या तुर्कीच्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना येथे प्रशिक्षण घेत आहे. तो 26 मे रोजी फिनलंडला रवाना होणार आहे. त्यानंतर तो 22 जूनपर्यंत फिनलंडमधील कुओर्टेन ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात ( Neeraj Chopra Training Finland ) असेल.
कुओर्टेन ओटीसी ( Quorten OTC ) ऍथलीट्ससाठी ऑलिम्पिक स्तरावरील इनडोअर आणि आउटडोअर सुविधा पुरवते आणि सध्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते देवेंद्र झाझरिया ( Paralympic gold medalist Devendra Jhazaria ) यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर येथेच आयोजित केले आहे. कुओटार्ने येथून, नीरज नंतर पावो नुर्मी गेम्स, त्यानंतर स्टॉकहोममधील कुओटार्ने गेम्स आणि त्यानंतर डायमंड लीगमध्ये भाग घेण्यासाठी तुर्कूला जाईल.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ( SAI ) नीरज आणि त्याच्या संघाला फिनलंडमध्ये राहताना कोणतीही अडचण येऊ नये याची खात्री करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी ( MEA ) संपर्क साधला आहे. एमईएने आपल्या प्रतिसादात साईला आश्वासन दिले आहे की, हेलसिंकी येथील भारतीय दूतावास आवश्यक असल्यास कोणत्याही मदतीसाठी उपलब्ध असेल.
-
#SAINews #Tokyo2020 Olympics 🥇 @Neeraj_chopra1 is set to ✈️ from 🇹🇷 to 🇫🇮 for 28 days for training camp in @kuortaneOTC ahead of his busy schedule lined up in June
— SAI Media (@Media_SAI) May 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Neeraj's camp in Finland has been sanctioned at a cost of Rs. 9.8 lakhs (approx.) to Govt under #TOPScheme
1/1 pic.twitter.com/t3SMzizAeJ
">#SAINews #Tokyo2020 Olympics 🥇 @Neeraj_chopra1 is set to ✈️ from 🇹🇷 to 🇫🇮 for 28 days for training camp in @kuortaneOTC ahead of his busy schedule lined up in June
— SAI Media (@Media_SAI) May 25, 2022
Neeraj's camp in Finland has been sanctioned at a cost of Rs. 9.8 lakhs (approx.) to Govt under #TOPScheme
1/1 pic.twitter.com/t3SMzizAeJ#SAINews #Tokyo2020 Olympics 🥇 @Neeraj_chopra1 is set to ✈️ from 🇹🇷 to 🇫🇮 for 28 days for training camp in @kuortaneOTC ahead of his busy schedule lined up in June
— SAI Media (@Media_SAI) May 25, 2022
Neeraj's camp in Finland has been sanctioned at a cost of Rs. 9.8 lakhs (approx.) to Govt under #TOPScheme
1/1 pic.twitter.com/t3SMzizAeJ
चार आठवड्यांच्या (28-दिवसीय) प्रशिक्षण शिबिराला सरकारच्या लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजनेद्वारे ( TOPS ) मंजुरी देण्यात आली आहे, ज्यासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ( MYAS ) सुमारे 9.8 लाख रुपयांची मदत प्रदान केली आहे. ही रक्कम नीरज आणि त्याचे प्रशिक्षक क्लॉस बॅटरीएट्स यांच्या प्रवास, निवास, प्रशिक्षण, स्थानिक प्रवास आणि इतर खर्चासाठी वापरली जाईल.