ETV Bharat / sports

टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा तापाने फणफणला - Neeraj Chopra down with high fever

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा तापाने फणफणला आहे. सुदैवानं त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

neeraj-chopra-suffering-from-high-fever-corona-test-negative
टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा तापानं फणफणला
author img

By

Published : Aug 14, 2021, 4:22 PM IST

Updated : Aug 14, 2021, 4:33 PM IST

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा तापाने फणफणला आहे. सुदैवानं त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण नीरजच्या आजाराचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले. त्याने भालाफेकमध्ये 87.58 मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताचे हे टोकियो ऑलिम्पिकमधील एकमात्र सुवर्ण पदक ठरले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये अशी कामगिरी करणारा नीरज चोप्रा भारताचा पहिला खेळाडू ठरला. तसेच त्याची क्रमवारी देखील या कामगिरीने सुधारली. नीरज टोकियो ऑलिम्पिकपूर्वी क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर होता. पण सुवर्ण पदकाची जिंकल्यानंतर नीरजने थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

दरम्यान, सुवर्ण पदक जिंकल्यानंतर एका मुलाखतीत नीरज चोप्राने पदक जिंकल्यानंतरचा दुसरा दिवस अतिशय कठीण गेला होता. संपूर्ण शरीर दुखत होते असे सांगितले होते. भारतात परल्यानंतर नीरजचे जंगी स्वागत करण्यात आले. पण ऑलिम्पिकसाठीची तयारी आणि त्यानंतरचा व्याप यामुळे अतिताणामुळे नीरजला ताप आला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी केली. टोकियोत भारताने 7 पदके जिंकली. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कास्य पदकाचा समावेश आहे. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये भारताने 6 पदके जिंकली होती. यात दोन रौप्य आणि चार कास्य पदकांचा समावेश होता.

हेही वाचा - 15 ऑगस्ट विशेष : ऑलिम्पिकवीरांना कलेच्या माध्यमातून अनोखी मानवंदना

हेही वाचा - T20 WC 2021: ICCची मोठी घोषणा, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ इतकेच खेळाडू घेऊ जाऊ शकतील

Last Updated : Aug 14, 2021, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.