नवी दिल्ली - भारतीय कुस्तीगीरांसाठी राष्ट्रीय शिबीर पुढील महिन्यात १ सप्टेंबरपासून सुरू होईल. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) शनिवारी याची घोषणा केली. हे शिबीर ३० सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. पुरुष कुस्तीपटूंसाठीचे शिबीर हरियाणाच्या सोनीपत येथे तर महिलांचे शिबीर लखनऊ येथे आयोजित केले जाईल.
आठ किलो वजनी गटातील एकूण २६ पुरुष कुस्तीपटू सोनीपत येथील शिबिरात सहभागी होतील. यामध्ये पाच फ्री स्टाईल (५७, ६५, ७४, ८६, १२५ किलो) आणि तीन ग्रीको रोमन्स (६०, ७७, ८७ किलो) समाविष्ट आहेत. त्यांच्यासमवेत सहा क्रीडा कर्मचारीही असतील.
त्याचबरोबर महिलांच्या शिबिरात एकूण १५ महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. लखनौच्या शिबिरात पाच (६०, ७७, ८७ किलो) समाविष्ट आहेत. त्यांच्यासमवेत चार क्रीडा कर्मचारी असतील.
पुरुष गटात रवी कुमार, बजरंग कुमार, नरसिंह यादव, दीपक पूनिया, सुमित ज्ञानेंद्र, साजन, सुनील कुमार, तर महिला गटात निर्मला देवी, विनेश फोगट, पूजा धंदा, साक्षी मलिक आणि दिव्या काकरान आहेत. प्राधिकरणाने ज्यांची नावे समाविष्ट केली आहेत. त्यांच्यापैकी बरेचसे कुस्तीपटू आपल्या केंद्रांवर प्रशिक्षण घेत आहेत. त्यापैकी दीपक पूनिया, रविकुमार आणि सुमित हे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेत आहेत, तर बजरंग सध्या कर्नाटकच्या बेल्लारी येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (आयआयएस) येथे जॉर्जियन प्रशिक्षक शाको बेन्टिनीडिस यांच्याकडे सराव करत आहे.
पुरुष गटात आतापर्यंत दीपक, रवी आणि बजरंग यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे, तर महिला गटात विनेश फोगाट ही एकमेव महिला कुस्तीपटू आहे ज्याने आतापर्यंत टोकियोचे तिकीट जिंकले आहे.