ETV Bharat / sports

वेटलिंफ्टिंग : मीराबाईने स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत जिंकले सुवर्णपदक - मीराबाई चानू

मणिपूरच्या २५ वर्षीय चानूने स्नैचच्या दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११५ किलो वजनासह तिने एकूण २०३ किलो वजन उचलले. याआधी तिने थायलंड विश्व चॅम्पियनशीपमध्ये २०१ किलो वजन उचलले होते.

Mirabai Chanu Breaks National Record, Lifts 203kg To Win Gold
वेटलिंफ्टिंग : मीराबाईने स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत जिंकले सुवर्णपदक
author img

By

Published : Feb 4, 2020, 9:51 PM IST

कोलकाता - भारताची महिला वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने राष्ट्रीय वेटलिंफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये २०३ किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले. तिने ४९ किलो वजनी गटात स्वत:चाच विक्रम मोडित काढत नव्या विक्रम नोंदवला.

मणिपूरच्या २५ वर्षीय मीराबाईने स्नैचच्या दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११५ किलो वजनासह तिने एकूण २०३ किलो वजन उचलले. याआधी तिने थायलंड विश्व चॅम्पियनशीपमध्ये २०१ किलो वजन उचलले होते.

Mirabai Chanu Breaks National Record, Lifts 203kg To Win Gold
मीराबाई वजन उचलताना...

मीराबाई चीनच्या जियांग हुईहुआ (२१२), हाऊ झीहुई (२११) आणि कोरियाच्या की री सोंगनंतर (२०९) जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.

मीराबाई चानू विक्रमासह...

मीराबाई २०१७ मध्ये विश्व विजेती आहे. तसेच तिने २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई भारताची महत्वाची खेळाडू असून तिच्याकडून पदकाची आपेक्षा आहे.

हेही वाचा - जेरेमी लालरिनंगाने नोंदवला राष्ट्रीय विक्रम!

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'ची जी. साथियानशी खास बातचित, पाहा काय म्हणाला...

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.