ETV Bharat / sports

हॅमिल्टनने साधली मायकल शूमाकरच्या विक्रमाशी बरोबरी

ब्रिटनच्या लुईस हॅमिल्टन याने तुर्की ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकत मायकल शूमाकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

author img

By

Published : Nov 15, 2020, 6:55 PM IST

Mercedes driver Lewis Hamilton wins seventh championship to equal Schumacher's record
हॅमिल्टनने साधली मायकल शूमाकरच्या विक्रमाशी बरोबरी

मुंबई - ब्रिटनच्या लुईस हॅमिल्टन याने तुर्की ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकत मायकल शूमाकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. दोघेही प्रत्येकी सात विश्व चॅम्पियनशीप जेतेपदासह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.

३५ वर्षीय हॅमिल्टनच्या नावे मागील काही दिवसात सर्वाधिक विजेतेपद पटकावण्याचा विक्रम आहे. ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर हॅमिल्टन याने ट्विट केले आहे. यात त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे. तसेच त्याने आपल्या यशाचे श्रेय देखील चाहत्यांना दिले आहे.

दरम्यान, याआधी हॅमिल्टन याने एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्सचा किताब आपल्या नावावर केला आहे. या विजयासह हॅमिल्टनने आपल्या संघाला म्हणजेच मर्सिडीजला सलग सातवे सांघिक जेतेपद मिळवून दिले होते. मर्सिडीजचा संघ सलग सात विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला. त्यांनी फेरारीचा सलग सहा विजेतेपदाचा विक्रमही मोडला. फेरारीने १९९९ ते २००४ या काळात अनुभवी मायकल शूमाकरसह सलग सहा विजेतेपदे जिंकली होती.

हेही वाचा - देशातील सहा 'केआयएससीई'साठी क्रीडा मंत्रालयाची मान्यता; पुण्यातील बालेवाडीचा समावेश

हेही वाचा - वर्ल्ड चॅम्पियन ख्रिस्टियन कोलमन टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.