ETV Bharat / sports

Dhyan Chand : अनवाणी पायानं खेळणाऱ्या ध्यानचंद यांना पाहून हिटलरंनं दिली होती 'ही'ऑफर! जाणून घ्या

हॉकीमध्ये एकेकाळी भारताचा मोठा दरारा होता. स्वातंत्र्यापूर्वी भारताने सलग तीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. यामध्ये एका खेळाडूचा मोठा वाटा होता, ध्यानचंद असं त्यांचं नाव. जर्मनीविरुद्ध खेळणाऱ्या ध्यानचंद यांना पाहून खुद्द जर्मनीचा हुकुमशाह हिटलरही अचंबित झाला. (Major Dhyan Chand)

Dhyan Chand
ध्यानचंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 9:41 AM IST

Updated : Aug 29, 2023, 11:55 AM IST

मुंबई : हॉकीचं नाव घेताच भारतीयांच्या डोळ्यासमोर मेजर ध्यानचंद यांचं चित्र उभं राहतं. त्यांना 'हॉकीचा जादूगार' देखील म्हटलं जातं. ध्यानचंद यांचा जन्म आजच्या दिवशी (२९ ऑगस्ट) १९०५ मध्ये झाला होता. त्यांचा सन्मानार्थ हा दिवस दरवर्षी 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार दिले जातात.

हिटलरसमोरच जर्मन संघाची धुलाई केली : भारताला सलग तीन ऑलिम्पिकमध्ये (१९२८ अ‍ॅमस्टरडॅम, १९३२ लॉस एंजेलिस आणि १९३६ बर्लिन) सुवर्णपदक मिळवून देण्यात ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यांचा सन्मान म्हणून भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला (मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार) ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलंय. ध्यानचंद यांनी भारतासाठी असे अनेक संस्मरणीय सामने जिंकले आहेत. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा हुकुमशाह हिटलरसमोरच जर्मन संघाची अशी धुलाई केली होती, त्याची चर्चा आजही होते.

सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदकावर कब्जा केला : १९३६ मध्ये जर्मनीची राजधानी बर्लिन येथे ऑलिम्पिक खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला सराव सामन्यात जर्मनीकडून ४-१ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. ध्यानचंद यांनी त्यांच्या 'गोल' या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, 'मी जिवंत असेपर्यंत हा पराभव कधीही विसरणार नाही. या पराभवाने मी रात्रभर झोपू शकलो नव्हतो. त्यानंतर फायनलमध्ये भारतीय संघाची गाठ पुन्हा एकदा जर्मनीशी पडली. या सामन्यात मात्र भारतानं आधीच्या पराभवाचा पुरेपूर वचपा काढला. भारतीय संघानं जर्मनीचा ८-१ असा दारूण पराभव करत सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविलं.

अनवाणी पायानं हॉकी खेळली : या सामन्यात ध्यानचंद यांनी तीन गोल करत हॅट्रीक नोंदविली. हाफ टाइमपर्यंत भारत एका गोलनं पुढं होता. त्यानंतर ध्यानचंद यांनी आपले शूज काढले आणि अनवाणी पायानं हॉकी खेळले. यानंतर भारतानं एकापाठोपाठ एक गोलची बरसात केली. सहा गोल केल्यानंतर, जर्मन खेळाडूंचा संयम सुटला आणि त्यांनी धसमुसळा खेळ करण्यास सुरुवात केली. त्यांचा गोलरक्षक टिटो वॉर्नहोल्झची हॉकी स्टिक ध्यानचंद यांच्या तोंडावर इतकी जोरदार आदळली की त्यांचे दात तुटले. प्राथमिक उपचारानंतर मैदानावर परतलेल्या ध्यानचंद यांनी भारतीय खेळाडूंना कोणताही गोल न करण्याच्या सूचना दिल्या. भारतीय खेळाडूंनी केवळ एकमेकांना चेंडू पास करत जर्मन खेळाडूंच्या नाकीनऊ आणले.

हिटलरची ऑफर नाकारली : ध्यानचंद यांच्या या कामगिरीनं खुश होऊन हिटलरनं त्यांना जेवायला बोलावलं. या दरम्यान हिटलरनं त्यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफर दिली. त्याबदल्यात त्यांना बलाढ्य जर्मन सैन्यात 'कर्नल' पदाचं आमिषही देण्यात आलं. मात्र ध्यानचंद यांनी ती ऑफर नम्रपणे नाकारली. 'हिंदुस्थान माझा देश आहे आणि मी तिथे आनंदी आहे, असं त्यांनी हिटलरला सांगितलं.

हॉकी स्टीकला चुंबक लावल्याची अफवा : ध्यानचंद यांच्याबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. ध्यानचंद आपल्या कारकिर्दीच्या ऐन भरात असताना, त्यांच्या हॉकी स्टीकला चुंबक लागलं असं म्हटलं जायचं. त्यानंतर नेदरलॅंडमधील एका सामन्यादरम्यान त्यांची हॉकी स्टीक तोडून पाहण्यात आली. अर्थातच त्याला चुंबक लावलं नव्हते. मात्र यावरून त्यांच्या हॉकीतील कौशल्याची जाणीव होते. ध्यानचंद यांचं ३ डिसेंबर १९७९ रोजी दिल्लीत निधन झालं. झाशी येथे ज्या मैदानावर ते हॉकी खेळायचे त्या मैदानावर त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा :

  1. National Sports Day 2023 :29 ऑगस्टला का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व...

Last Updated : Aug 29, 2023, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.