ETV Bharat / sports

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा 'महाराष्ट्र केसरी'.. लातूरच्या शेळकेवर मात - महाराष्ट्र केसरी २०२०

नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने अंतिम सामन्यात लातूरच्या शैलशे शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली.

maharashtra kesari 2020 final live update : shailesh shelke vs harshvardhan sadgir
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा 'महाराष्ट्र केसरी'.. लातूरच्या शेळकेवर मात
author img

By

Published : Jan 7, 2020, 4:36 PM IST

Updated : Jan 7, 2020, 7:54 PM IST

पुणे - नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने अंतिम सामन्यात लातूरच्या शैलशे शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली. या विजयानंतर हर्षवर्धनने उपविजेता शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्ती दाखवत मैत्रीचे दर्शन घडवले. दोघेही काका पवार यांचे पठ्ठे असून अंतिम लढतीत दोनही मल्लांनी जिरगबाज खेळ केला.

हर्षवर्धनने अंतिम फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत शैलेश शेळकेवर मात केली. पुण्याच्या म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम लढतीसाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

शैलेश आणि हर्षवर्धन हे काका पवार यांच्या तालमीत शिकत असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थान आणि कच्चे दुवे माहित होते. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. पण अती बचावात्मक कुस्ती खेळल्याने पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला.

दुसऱ्या डावातही चुरस पाहायला मिळाली. दोनही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची एकही संधी देत नव्हते. तेव्हा शेवटचे दीड मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धनला एक गुण अती बचावात्मक पद्धतीने मिळाला आणि त्याने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर शैलेशला एक गुण मिळाला. तेव्हा मात्र, शेवटच्या २० सेंकदात हर्षवर्धनने निर्णायक २ गुण घेत बाजी मारली आणि मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

दरम्यान, यंदाचा नवा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 7, 2020, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.