ETV Bharat / sports

FIDE World Cup 2023 : मॅग्नस कार्लसन 'बुद्धिबळ विश्वविजेता'; भारताच्या आर प्रज्ञानंदचा पराभव - मॅग्नस कार्लसन बुद्धिबळ विश्वचषक विजेता 2023

बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला. भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित झाल्या होत्या, त्यामुळे टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला.(Chess World Cup Final 2023) (FIDE World Cup 2023)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 5:30 PM IST

Updated : Aug 24, 2023, 6:22 PM IST

बाकू - विजेता होण्यासाठी टायब्रेकरमध्ये २५-२५ मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला सामना कार्लसन याने जिंकला होता. तर दुसरा सामना प्रज्ञानंद याला जिंकणे अनिवार्य होते. पण दुसरा सामना अनिर्णित राहिला. अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता ठरला. (Chess World Cup Final 2023) (FIDE World Cup 2023)

  • International Chess Federation (FIDE) tweets, "Praggnanandhaa is the runner-up of the 2023 FIDE World Cup! Congratulations to the 18-year-old Indian prodigy on an impressive tournament! On his way to the final, Praggnanandhaa beat, among others, world #2 Hikaru Nakamura and #3… pic.twitter.com/g9Ky5VUdA4

    — ANI (@ANI) August 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रज्ञानंद इतिहास रचण्यापासून मुकला - भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचा अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारताचा प्रज्ञानंद इतिहास रचण्यापासून मुकला आहे. पहिल्या टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी फाईट दिली होती, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने चांगला खेळ करत प्रज्ञानंदचा पराभव केला.

टायब्रेकरमधील पहिले दोन सामने अनिर्णित - रमेशबाबू प्रज्ञानंदनं सोमवारी जोरदार खेळाचं प्रदर्शन केलं. अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचा पराभव करत भारतीय युवा ग्रँडमास्टर प्रज्ञानंदनं या खेळावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या सामन्यात प्रज्ञानंदनं अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचा 3.5-2.5 असा पराभव केला होता. पहिले दोन टायब्रेक सामने अनिर्णित होते. मात्र, तिसर्‍या सामन्यात प्रज्ञानंदनं कारुआनाचा पराभव करून पुढचा सामना बरोबरीत सोडवला.

  • #WATCH | After Indian chess grandmaster R Praggnanandhaa finishes second at 2023 FIDE World Cup, his father Ramesh Babu, says, "In the final, he played against world no.1 Magnus Carlsen. Losing or winning this match was not important but playing against world no.1 was very… pic.twitter.com/JYVMWTNvIE

मोठ्या बहिणीकडून प्रेरणा - भारतीय युवा बुद्धीपळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदनं अत्यंत कमी कालावधीत यश मिळवलं. रमेशबाबू प्रज्ञानंद यानं त्याच्या मोठ्या बहिणीकडून प्रेरणा घेत बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या तिसऱ्यात वर्षी त्यानं बुद्धीबळाच्या खेळाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवायला सुरुवात केली. त्यामुळे रमेशबाबू प्रज्ञानंद हा आपल्या यशाचं श्रेय आपली बहीण वैशाली हिला देतो. रमेशबाबू प्रज्ञानंद याला टीव्हीवर कार्टून पाहण्याची सवय होती. त्यामुळे वैशाली हिने रमेशबाबू याची ही सवय सोडवण्यासाठी बुद्धीबळाचा खेळ शिकवल्याचं प्रज्ञानंदनं स्पष्ट केलं आहे.

टीव्हीवर कार्टून पाहण्याचा होता छंद - भारतीय बुद्धीबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंद याला टीव्हीवर कार्टून पाहण्याचा छंद होता. त्याचा वेळ कार्टून पाहण्यात जात होता. त्याच्या मोठ्या बहीण असलेल्या वैशाली यांनाही कार्टून पाहण्याचा छंद होता. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी मुलांचा कार्टून पाहण्याचा छंद सुटण्यासाठी त्यांना बुद्धीबळ खेळण्याची प्रेरणा दिली. वैशाली यांची सवय सोडण्यासाठी आम्ही बुद्धीबळाकडं त्यांना जोडलं होतं. मात्र, त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांनी करिअर म्हणून बुद्धीबळ निवडलं. आता दोघंही चांगलं नाव करत असल्याची प्रतिक्रिया रमेशबाबू प्रज्ञानंद यांच्या वडिलांनी दिली.

Last Updated : Aug 24, 2023, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.