ETV Bharat / sports

Commonwealth Games 2022 : गोंधळानंतर लोव्हलिना बोरगोहेनच्या प्रशिक्षक संध्या गुरुंगला मिळाली मान्यता - CWG Accreditation

स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनच्या ( Star boxer Lovlina Borgohen ) वैयक्तिक प्रशिक्षक संध्या गुरुंग यांना मंगळवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मान्यता मिळाली. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिना हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मानसिक छळामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीवर परिणाम होत आहे, असे म्हणले होते.

Lovlina Borgohen
लोव्हलिना बोरगोहेन
author img

By

Published : Jul 26, 2022, 7:31 PM IST

नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेनचे वैयक्तिक प्रशिक्षक संध्या गुरुंग यांना मंगळवारी राष्ट्रकुल क्रीडा 2022 साठी मान्यता देण्यात ( Coach Sandhya Gurung Receives Accreditation CWG2022 ) आली आहे. लोव्हलिनाने सोमवारी सोशल मीडियावर तिची पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने आरोप केला होता की, तिचे प्रशिक्षक वारंवार बदलल्यामुळे तिला 'मानसिक छळ' होत आहे.

  • Olympic medallist boxer Lovlina Borgohain alleges mental harassment, says, "training stopped 8 days before Commonwealth Games" pic.twitter.com/z9gkeQnHpm

    — ANI (@ANI) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या वृत्ताला दुजोरा देताना आयओएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, संध्या गुरुंगला मंगळवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मान्यता मिळाली आहे. आयर्लंडमध्ये 15 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर भारतीय बॉक्सिंग संघ रविवारी रात्री बर्मिंगहॅममधील गेम्स व्हिलेजमध्ये पोहोचला. तथापि, लोव्हलिनाच्या वैयक्तिक प्रशिक्षक संध्या गुरुंग ( Lovlina personal Coach Sandhya Gurung ) यांना प्रवेश दिला गेला नव्हता. कारण ती मान्यताप्राप्त प्रशिक्षक नव्हती. यानंतर लव्हलिनाने ट्विटरवर एका लांबलचक पोस्टमध्ये तिच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.

टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन ( Boxer Lovlina Borgohen ) हिने राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीवर प्रभाव टाकल्याबद्दल अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांची क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) तातडीने दखल घेतली. लोव्हलिनाच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना, IOA ने एका निवेदनात म्हटले आहे की बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये तिच्या प्रशिक्षक संध्या गुरुंगच्या मान्यतेबद्धल टीम इंडियाची बॉक्सर लोव्हलिनाने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेतली आहे.

  • We have urged the Indian Olympic Association to immediately arrange for the accreditation of the coach of Lovlina Borgohain. https://t.co/6GhD72cvY4

    — Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Commonwealth Games 2022 : बर्मिंगहॅममध्ये पुन्हा टोकियोसारखा जयघोष करण्यास भारतीय संघ सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.