टोकियो - जपानच्या टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे दुसरे पदक निश्चित झाले आहे. आज शुक्रवारी सकाळी भारताची स्टार बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव करत पदक पक्के केले.
लवलिनाने 69 किलो वजनी गटात चीनी तैईपे बॉक्सरचा 4-1 ने पराभव केला. या विजयासह लवलिना उपांत्य फेरीत पोहोचली आहे. दुसरीकडे भारताचे हे दुसरे पदक आहे. यामुळे देशात आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनावर मात करत पोहोचली टोकियोला
लवलिनाला ऑलिम्पिकला सुरूवात होण्याआधी कोरोनाची लागण झाली होती. ती काही दिवस रुग्णालयात होती. पण तिने कोरोनावर मात करत टोकियो गाठले आणि तिथे दमदार कामगिरी करत पदक निश्चित केलं.
लवलिनाचा वडिल सामना पाहू शकले नाहीत
मुलीने देशासाठी पदक निश्चित केल्याचे ऐकून लवलिनाच्या वडिलांना आनंद व्यक्त केला. पण ते लवलिनाचा सामना पाहू शकले नाही. पण ते मुलीचा उपांत्य फेरीचा पाहतील, अशी आशा आहे.
देशाला लवलिनाकडून आशा
आसामच्या गोलाघाटमध्ये राहणारी लवलिनाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी अभिनंदन केलं. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. बिस्वा यांच्यासह लोकसभा स्पिकर ओम बिडला यांनी देखील लवलिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - Tokyo Olympic : शाब्बाश पोरी! लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत; भारताचे पदक पक्के
हेही वाचा - Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधू रोमहर्षक विजयासह उपांत्य फेरीत