बहरीन - सात वेळा विश्वविजेता मॅर्सिडिज संघाचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने बहरीन ग्रँड प्रिक्स जिंकून हंगामातील आपला ११वा विजय नोंदवला. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरा तर, अॅलेक्स अल्बॉनने तिसरा क्रमांक पटकावला.
या शर्यतीच्या सुरूवातीस, रोमेन ग्रोस्जेनच्या गाडीचा पहिल्या लॅपमध्ये अपघात झाला. तो तिथे असलेल्या बॅरियरवर जाऊन आदळला. त्याच्या गाडीला आग लागली. या आगीमुळे शर्यत थांबवण्यात आली.


हेही वाचा - मॅराडोना यांचा मृत्यू दुर्लक्षपणामुळे?
आगीवंर नियंत्रण मिळवल्यानंतर शर्यत सुरू झाली. या शर्यतीत हॅमिल्टनने सहज विजय नोंदवला. तिसऱ्या क्रमांकासाठी अॅलेक्स अल्बॉन यांनी सर्जियो पेरेझ यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. मेक्सिकोचा पेरेझ दुसऱ्या शर्यतीत दुसऱ्यांदा पोडियम मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र, अल्बॉनने आघाडी घेत तिसरा क्रमांक पटकावला.