बर्लिन: दहा खेळाडूंसह खेळूनही लीपझिगने शानदार पुनरागमन करत फ्रीबर्गचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करून जर्मन कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद ( German Cup Football Championship ) पटकावले. फ्रीबर्गला 19व्या मिनिटाला मॅक्समिलन ऍग्स्टीनने आघाडी मिळवून दिली. अशा स्थितीत 57व्या मिनिटाला मार्सेल हेस्टेनबर्गला रेड कार्ड मिळाल्याने लीपझिगला 10 खेळाडूंसह खेळावे लागले.
लीपझिगच्या ख्रिस्तोफर नाकुंकूने 76व्या मिनिटाला बरोबरीचा गोल करून सामना अतिरिक्त वेळेत आणि पेनल्टीवर वाढवला. फ्रीबर्गचा कर्णधार ख्रिश्चन गुंटर ( Freiburg captain Christian Gunter ) आणि एर्मिडिन डेमिरोविक हे दोघेही पेनल्टीवर गोल करू शकले नाहीत.
2009 मध्ये लीपझिग क्लबची स्थापना झाल्यानंतर हे पहिले विजेतेपद ( Leipzig Club first title ) आहे. क्लबने गेल्या वर्षी बोरुसिया डॉर्टमंड आणि 2019 मध्ये बायर्न म्युनिचकडून अंतिम फेरी गाठली होती.
हेही वाचा - IPL 2022 SRH vs PBKS : आयपीएल लीग स्टेजमधील अखेरचा सामना, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आज आमने सामने