बंगळुरू: ऑलिम्पियन जलतरणपटू श्रीहरी नटराजने गुरुवारी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स (Khelo India University Games) मध्ये तीन सुवर्णपदके जिंकली. ज्यामुळे यजमान जैन विद्यापीठाने 14 सुवर्ण पदकांसह जलतरण तलावावर वर्चस्व राखले. जैन विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नटराजने 100 मीटर फ्रीस्टाईल, 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि 4x200 मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. या सर्व स्पर्धांमध्ये त्याने नवे विक्रमही केले आहेत.
नटराजने 50.98 सेकंदांचा वेळ नोंदवून रुद्रांश मिश्राने 2020 मध्ये 100 मीटर फ्रीस्टाइलमधील 53.01 चा विक्रम मोडला. हीर शाह (मुंबई विद्यापीठ) यांनी 52.78 सेकंद आणि आदित्य दिनेश (अण्णा विद्यापीठ) यांनी 52.79 सेकंदांची वेळ नोंदवत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. नटराजने 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये ( 50m backstroke ) 26.10 सेकंदाची वेळ नोंदवली. शिव श्रीधर (जैन विद्यापीठ) यांनी 27.10 सेकंद आणि सिद्धांत सेजवाल (पंजाब विद्यापीठ) यांनी 27.69 सेकंदात अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
यानंतर नटराजने संजय जयकृष्णन, शिव श्रीधर आणि राज रेळेकर यांच्यासोबत 4x200 मीटर फ्रीस्टाइल रिले ( 4x200m freestyle relay ) आठ मिनिटे 06.87 सेकंदाच्या नवीन विक्रमी वेळेसह पूर्ण केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 8: 22.17 सेकंद वेळेसह रौप्यपदक पटकावले. तर मुंबई विद्यापीठाने 8: 28.57 सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले.
-
Here's the #KIUG2021 Medal Tally for Today, 28th April 2022 🏅
— Khelo India (@kheloindia) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Jain University stays put at the Top with 24 medals in total💯
University of Mumbai took a big leap from 6th position to 3rd position😎
Give a shout out to the top universities in the comments below 👇#KheloIndia pic.twitter.com/QvNNPYQVKN
">Here's the #KIUG2021 Medal Tally for Today, 28th April 2022 🏅
— Khelo India (@kheloindia) April 28, 2022
Jain University stays put at the Top with 24 medals in total💯
University of Mumbai took a big leap from 6th position to 3rd position😎
Give a shout out to the top universities in the comments below 👇#KheloIndia pic.twitter.com/QvNNPYQVKNHere's the #KIUG2021 Medal Tally for Today, 28th April 2022 🏅
— Khelo India (@kheloindia) April 28, 2022
Jain University stays put at the Top with 24 medals in total💯
University of Mumbai took a big leap from 6th position to 3rd position😎
Give a shout out to the top universities in the comments below 👇#KheloIndia pic.twitter.com/QvNNPYQVKN
अण्णा विद्यापीठाच्या दानुष सुरेशने (1:03.36सेकंद) 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले ( Danush Suresh won gold medal ), तर मुंबई विद्यापीठाच्या जय एकबोटे (1:06.33सेकंद) आणि अॅडमास विद्यापीठाच्या कृत्युष सिंगने (1:07.16से) रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. केले धनुर्विद्यामध्ये तफावत दिसून आली. महिलांच्या कंपाऊंडच्या वैयक्तिक गटात राणी दुर्गावती विद्यापीठाच्या मुस्कान किरारने अव्वल स्थान पटकावले. पण पुढच्या फेरीत तिला गुरू नानक देव विद्यापीठाच्या स्नेह राणीकडून पराभव पत्करावा लागला.
मागील वर्षीची रौप्यपदक विजेत्या रागिणी मार्कूला उपांत्य फेरीच्या पुढे प्रगती करता आली नाही. पुरुषांच्या कंपाऊंड स्पर्धेत पंजाबी विद्यापीठाच्या अव्वल मानांकित कुलविंदर सिंगला पहिल्या फेरीत शिवाजी विद्यापीठाच्या कुणाल शिंदेकडून 141-143 असा पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा - Kiug 2021 : जैन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन