ETV Bharat / sports

Saweety & Deepak Marriage : बॉक्सर स्वीटी बुरा आणि कबड्डीपट्टू दीपक हुडा अडकले लग्नाच्या बेडीत

author img

By

Published : Jul 8, 2022, 5:39 PM IST

आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्वीटी बुरा आणि कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडा यांनी 7 फेरे घेत लग्नगाठ ( Wedding of Deepak Hooda and Sweety Bura ) बांधली. हा विवाह हरियाणातील हिसार येथे झाला. या लग्नाला कबड्डीतील अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती.

Saweety & Deepak
Saweety & Deepak

हैदराबाद : आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्वीटी बुरा ( International boxer sweetie Bura) आणि भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडा ( Indian Kabaddi team captain Deepak Hooda ) हे एकमेकांचे साथीदार झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सात फेरे घेत दोघे लग्न केले. दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. विवाह विधी पार पाडल्यानंतर, स्वीटीच्या पालकांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले आणि त्यांना हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील सेक्टर-4 येथील त्यांच्या निवासस्थानातून निरोप दिला. स्वीटी बुराचे सासर रोहतकमध्ये आहे.

बॉक्सर स्वीटी बुरा ( Boxer sweetie Bura ) आणि कबड्डीपटू दीपक हुडा यांची 2015 साली एका कार्यक्रमात भेट झाली होती. स्वीटीला दीपकचा खेळ खुप आवडतो. यानंतर दोघांमधील जवळीक वाढली. वर्षभरानंतर दीपकने स्वीटीला प्रपोज केले ( Deepak Hooda proposed to Sweety Bura ). सुरुवातीला स्वीटी बुरा जास्त प्रसिद्ध होती. त्यामुळे घरच्यांचा या लग्नावर आक्षेप होता. यानंतर दोघांनी सात वर्षे वाट पाहिली आणि आता दोघांनी लग्न केले.

स्वीटी बुरा लहानपणी कबड्डी खेळायची. पण तिचे स्वप्न बॉक्सर बनण्याचे होते. स्वीटी 15 वर्षांची असताना तिने घरी बॉक्सर बनण्याबद्दल सांगितले. कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यास विरोध केला. पण वडील महेंद्रसिंग यांनी मुलीला आधार देत बॉक्सिंगच्या सरावासाठी पाठवले. 2009 साली स्विटीच्या मेहनतीला फळ मिळाले आणि तिने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. स्वीटीने अखिल भारतीय स्तरावर पाच वेळा चॅम्पियन ( Sweety five-time all-India champion ) बनण्याचा विक्रम केला आहे.

एका मुलाखतीत स्वीटीने सांगितले होते की, तिने बॉक्सर बनण्यासाठी खूप मेहनत केली आहे. ती रोज 12 किमी सायकल चालवायची. तिने सांगितले, सराव केंद्र तिच्या शाळेपासून 6 किलोमीटरवर होते. त्यामुळेच ती रोज 12 किलोमीटर सायकल चालवून सरावाला येत-जात असायची.

भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडा हा रोहतकचा रहिवासी आहे. तो एक व्यावसायिक खेळाडू आहे. दीपक प्रो कबड्डी लीगमध्ये जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार ( Jaipur Pink Panthers captain Deepak Hooda ) आहे. दीपकला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तो चार वर्षांचा असताना त्यांनी आपल्या आईला गमावले. त्याचे संगोपन त्यांच्या मोठ्या बहिणीने आणि वडिलांनी केले.

2013 मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याने शाळेत जाणे बंद केले आणि मुलांना शिकवून घर चालवण्यास सुरुवात केली. दीपक हुडा यांना शिक्षण घ्यायचे होते, आर्थिक स्थिती सुधारताच त्याने पदवीला प्रवेश घेतला.

हेही वाचा - Happy Birthday Dada : 20 वर्षांनंतर भारताला फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या दादाचा आज 50 वा वाढदिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.