ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : विश्वचषकात उलटफेरांचे सत्र सुरुच, कोस्टा रिकाने जपानचे कडवे आव्हान 1-0 ने मोडून काढले

युवा खेळाडू फुलरने 81व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलच्या बळावर रविवारी कोस्टा रिकाने जपानला 1-0 ने पराभूत केले. (JAPAN VS COSTA RICA) (FIFA World Cup 2022).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 27, 2022, 9:20 PM IST

दोहा (कतार) : युवा खेळाडू फुलरने 81व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलच्या बळावर रविवारी कोस्टा रिकाने जपानला 1-0 ने पराभूत केले. (JAPAN VS COSTA RICA). दोन सामन्यानंतर दोन्ही संघांचे ई गटात तीन गुण आहेत. फुलरने जपानच्या बचावात्मक त्रुटीचा फायदा घेत 18 मीटर अंतरावरून नेटमध्ये शॉट मारला, जो जपानचा गोलरक्षक शुची गोंडा याला अडवता आला नाही. (FIFA World Cup 2022).

हाफ टाईम पर्यंत एकही गोल नाही : हाफ टाईम पर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. कागदावर कमजोर असणाऱ्या कोस्टा रिकाच्या संघाने जपानला कडव टक्कर दिली. चेंडूवर ताबा मिळवण्याच्या बाबतीत कोस्टा रिकाचा संघ जपानपेक्षा सरस ठरला. कोस्टा रिकाचा चेंडूवर ताबा 58 टक्के तर जपानचा 42 टक्के होता.

दोन्ही संघांची स्टार्टींग 11 :

कोस्टा रिका : केलर नव्हास, ऑस्कर दुआर्टे, ब्रायन ओव्हिडो, फ्रान्सिस्को कॅल्व्हो, केंडल वेस्टन, केशर फुलर, सेल्सो बोर्जेस, गेर्सन टोरेस, येल्तसिन तेजेडा, अँथनी कॉन्ट्रेरास, जोएल कॅम्पबेल.

जपान : शुची गोंडा, मिकी यामाने, कौ इटाकुरा, युटो नागातोमो, माया योशिदा (सी), वाटारू एंडो, रित्सु डॉन, हिदेमासा मोरिता, दाइची कामदा, युकी सोमा, अयासे उएडा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.