टोकियो - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनार्ड ट्रम्प यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात यावी, असा सल्ला दिला होता. पण ट्रम्प यांचा सल्ला जपानने नाकारला असून त्यांनी ही स्पर्धा पुढे ढकलणार नसल्याचे सांगितलं आहे.
याविषयी ऑलिम्पिक मंत्री सेइको हॅशिमोटो यांनी सांगितले की, 'आयओसी आणि नियोजन समिती ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याच्या बाबतीत कोणताही विचार केलेला नाही आणि करणारही नाही. आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊ.'
दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल आदींच्या सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत तसेच काही पुढे ढकलण्यात आले आहेत.
चीनमधून जगभरात फोफावत चाललेल्या कोरोना विषाणूमुळे ५ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर जगभरातील १०० हून अधिक देशात याचा फैलाव झाला आहे. जपानमध्ये आतापर्यंत कोरोनाची ७१६ प्रकरणे आहेत. तर कोरोनाने २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे सांगलीतील महापौर चषक कुस्ती आणि एकांकिका स्पर्धा रद्द
हेही वाचा - कोरोना प्रभाव : कोल्हापुरातील कुस्ती स्पर्धा रद्द