टोकियो - कोरोना व्हायरसमुळे अजून गंभीर परिस्थिती उद्भवल्यास पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणे कठीण होईल, असे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे म्हणाले आहेत. यावर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
ऑलिम्पिक संबंधित प्रश्नाला उत्तर देताना आबे म्हणाले, की खेळाडू आणि प्रेक्षकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि यासाठी व्हायरस रोखणे आवश्यक आहे. आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत, की ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा तेव्हा आयोजित करण्यात याव्यात जेव्हा प्रत्येकजण या स्पर्धेत सुरक्षितपणे सहभागी होऊ शकेल. कोरोना व्हायरस गेला नाही तर अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करणे अशक्य होईल.
''2021मध्ये कोरोनावर नियंत्रण आले नाही तर, ही स्पर्धा रद्द होऊ शकते. यापूर्वी जागतिक युद्धाच्या वेळीही या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. तर व्हायरसवर नियंत्रण ठेवले तर, आम्ही पुढच्या उन्हाळ्यात ऑलिम्पिकचे आयोजन करू'', अशी माहिती आयोजक समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी दिली आहे.