ETV Bharat / sports

ओमान ओपन : भारताच्या मुदित दानीची चांगली सुरूवात

मुदितने पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात ओमानच्या असद अलारियासीचा ११-६, ११-२, ११-५, ११-४ असा पराभव केला. मुदितचा पुढील सामना पोर्तुगालच्या मार्कोस फ्रीटासशी होईल.

author img

By

Published : Mar 14, 2020, 8:10 AM IST

India's Mudit's good start at Oman Open table tennis tornament
ओमान ओपन : भारताच्या मुदित दानीची चांगली सुरूवात

मस्कत - भारतीय टेबल टेनिसपटू मुदित दानीने २०२० आयटीटीएफ चॅलेन्जर प्लस ओमान ओपनमध्ये चांगली सुरूवात केली आहे. मुदितने आपला पहिल सामना ४-० ने जिंकला. त्याने पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात ओमानच्या असद अलारियासीचा ११-६, ११-२, ११-५, ११-४ असा पराभव केला.

हेही वाचा - ISL FINAL : एटीके एफसी आणि चेन्नई एफसी यांच्यात रंगणार द्वंद्व

मुदितचा पुढील सामना पोर्तुगालच्या मार्कोस फ्रीटासशी होईल. दुसरीकडे भारतीय खेळाडू मानुष शाहने ४-१ ने विजय मिळवत 'राउंड-ऑफ-३२' मध्ये स्थान पक्के केले आहे. मानुषने ओमानच्या मुहम्मद अल बालुशीला १२-१०, ११-१, ११-५, ११-४, ११-५ असे हरवले. मानुषचा पुढील सामना भारताच्या अचंता शरथ कमलशी होईल.

पहिल्या फेरीत अचंताशिवाय मानव ठक्कर आणि हरमीत देसाई यांना बाय मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.