मुंबई - भारतीय महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने आंतराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्जल केले आहे. प्रिया मलिकने हंगेरीमध्ये आयोजित जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
मीराबाई चानूनंतर प्रिया मलिकने भारतासाठी पदक जिंकलं -
ऑलिम्पिक स्पर्धा टोकियोमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकले. तिच्या या कामगिरीनंतर प्रत्येक देशवासियांना गर्व वाटत आहे. आता प्रिया मलिकने कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.
प्रिया मलिक हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील निवाली येथील रहिवाशी आहे. तिने निडानी येथील चौधरी भरत सिंह मेमोरियल क्रीडा शाळेत कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. प्रियाचे वडिल जयभगवान निडानी हे भारतीय सेनेतून निवृत्त झालेले आहेत.
प्रशिक्षक अंशुची प्रियाला साथ
प्रिया मलिकच्या यशात तिचे प्रशिक्षक अंशु मलिक यांचा मोलाचा वाटा आहे. प्रियाने 2000 साली नॅशनल स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय तिने राष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेत देखील सुवर्ण मिळवलं आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे प्रियाचे स्वप्न आहे.
हेही वाचा - मोफत पिझ्झा ते ही आयुष्यभर; रौप्य पदक विजेती मीराबाई चानूसाठी पिझ्झा कंपनीची घोषणा
हेही वाचा - Tokyo Olympic : मीराबाई जिंकत असताना कुटुंबियांची काय होती रिअॅक्शन, पाहा भावूक व्हिडिओ