नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेनच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला बॉक्सिंग संघ ( Indian women's boxing team ) गुरुवारी आयबीए ( IBA )महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 ( Women's World Boxing Championship 2022 ) साठी तुर्कीला रवाना झाला. या शिबिरात भारतीय संघ कझाकस्तान, तुर्की, अल्जेरिया, पनामा, लिथुआनिया, मोरोक्को, बल्गेरिया, सर्बिया, डोमिनिकन रिपब्लिक आणि आयर्लंड या देशांतील बॉक्सर्ससोबत सराव करणार आहेत.
हे शिबिर 20 एप्रिल ते 5 मे या कालावधीत चालणार आहे. 6 मे ते 21 मे दरम्यान इस्तंबूल येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ( World Championships Tournament ) होणार आहे. आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत एक रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत.
जागतिक चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ : नीतू (48 किलो), अनामिका (50 किलो), निखत (52 किलो), शिक्षा (54 किलो), मनीषा (57 किलो), जास्मिन (60 किलो), परवीन (63 किलो), अंकुशिता (66 किलो), लोव्हलिना (70 किलो), स्वीटी (75 किलो), पूजा राणी (81 किलो) आणि नंदिनी (प्लस 81 किलो).