नवी दिल्ली - यंदाच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. कतारमधील दोहा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी २५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा - रोहित शर्मा आला रे..! कसोटीत सलामीला येणार हिटमॅन
२७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे. भाला फेक प्रकारातील खेळाडू नीरज चोप्रा आणि धावपटू द्युती चंद यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. विक्रमवीर हिमा दास हिला रिले प्रकारात संघात स्थान मिळाले आहे. द्युती या स्पर्धेसाठी पात्र झाली नव्हती. तिचा संघातील समावेश हा फक्त एएफआयच्या निर्णयावर अवलंबून होता.
या खेळाडूंशिवाय, आशियाई सुवर्णपदक विजेता आणि बर्लिन येथे खेळल्या गेलेल्या १५०० मीटर धावप्रकारात कांस्यपदक पटकावलेल्या जिंसन जॉनसनला संघात सामील करुन घेण्यात आले आहे. सध्या तो प्रशिक्षक स्कॉट सिमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेत सराव करत आहे.
संघ -
पुरुष : जाबिर एमपी, जिंसन जॉनसन, अविनाश सेबल, के टी इरफान आणि देवेंद्र सिंह, टी. गोपी, एम. श्रीशंकर, तजिंदर पाल सिंह तूर, शिवपाल सिंह, मोहम्मद अनास, निर्मल नाओ टॉम, एलेक्स एंटनी, अमोज जैकब, केएस जीवन, धारुन अय्यास्वामी आणि हर्ष कुमार
महिला : पी यू चित्रा, अन्नू रानी, हिमा दास, विस्मया वीके, पूवम्मा एमआर, जिस्ना मैथ्यू, रेवती वी, सुभावनकत्सन, विथ्या आर.