ETV Bharat / sports

भारतालाही 'वाडा'चा दणका, डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानं दोन खेळाडूंचे केलं निलंबन

भारतीय नेमबाज रवि कुमार आणि बॉक्सर सुमित सांगवान हे उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत (डोपिंग) दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर 'वाडा'कडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

indian Shooter Ravi Kumar and indian boxer Sumit Sangwan fail dope tests
भारतालाही 'वाडा'चा दणका, डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानं दोन खेळाडूंचे केलं निलंबन
author img

By

Published : Dec 11, 2019, 5:13 PM IST

Updated : Dec 11, 2019, 5:21 PM IST

नवी दिल्ली - भारतीय नेमबाज रवि कुमार आणि बॉक्सर सुमित सांगवान हे उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत (डोपिंग) दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

डोपिंग चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर 'वाडा'कडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. २९ वर्षीय रविकुमारने शूटिंग विश्वचषक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. तर २६ वर्षीय सांगवान याने २०१७ एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले होते. दरम्यान, नेमबाज रवि कुमार आणि बॉक्सर सुमित सांगवान हे दोघेही आता भारताच्या ऑलिम्पिक पथकाचे सदस्य असणार नाहीत.

  • Boxer Sumit Sangwan has tested positive for a substance acetazolamide, which has been banned by World Anti-Doping Agency (WADA).

    — ANI (@ANI) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यासाठी ७ महिन्याचा अवधी शिल्लक असून ऑलिम्पिकसाठी पात्रता सामने खेळवण्यात येत आहेत. या स्पर्धेआधीच भारताल जबर धक्का बसला आहे. रवि कुमार आणि सुमित सांगवान हे भारताचे महत्वाचे खेळाडू आहेत. दोघांनी अनेक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केलं आहे.

त्यांच्यावर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेकडून सोमवारी डोपिंगच्या आरोपाखाली रशियावर ४ वर्षांसाठी बंदी घातली. त्यामुळे आता पुढील चार वर्षे रशियाचा कोणताही खेळाडू कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. रशियाच्या खेळाडूंबाबत डोपिंगची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती, त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप देखील झाले होते. यामुळे वाडाने बंदीची कारवाई केली.

हेही वाचा - रशियाला 'वाडा'चा दणका, ऑलिम्पिकसह फुटबॉल विश्वकरंडकातून पत्ता कट

हेही वाचा - सलाम मातृत्वाला..! लाईव्ह सामन्यादरम्यान महिला खेळाडूने बाळाला पाजलं दूध, फोटो व्हायरल

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 11, 2019, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.