नवी दिल्ली - राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेलाने कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अपूर्वीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या निधीपैकी तीन लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीमध्ये आणि दोन लाख रुपये राजस्थानच्या मुख्यमंत्री निधीत देण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त, भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी सोशल मीडियावर चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट केले, की भारतीय नागरिक म्हणून मला पीएम रिलीफ फंडामध्ये दोन लाख रुपये, तेलंगाणाच्या मुख्यमंत्री निधीमध्ये दीड लाख आणि पन्नास हजार कँट बोर्डाला दिले आहेत. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियानेही दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.