ETV Bharat / sports

कोरोना युद्ध : भारतीय नेमबाज अंकुर मित्तलकडून मदतनिधीचे आश्वासन - भारतीय नेमबाज अंकुर मित्तल कोरोना मदत न्यूज

भारतीय नेमबाजपटू अंकुर मित्तलने शुक्रवारी पंतप्रधान सहायचा निधीला १ लाख आणि हरियाणा कोरोना रिलीफ फंडाला ५१ हजाररुपये देण्याचे आश्वासन दिले.

Indian shooter Ankur Mittal donates Rs 1 lakh to fight corona virus
कोरोना युद्ध : भारतीय नेमबाज अंकुर मित्तलकडून मदतनिधीचे आश्वासन
author img

By

Published : Apr 3, 2020, 6:41 PM IST

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. क्रीडाक्षेत्रातील अनेक खेळाडू विविध मार्गाने मदतीचा हात देत आहेत. महिला नेमबाजपटू अपूर्वी चंडेलानंतर, अंकुरल मित्तलनेही मदतनिधी जाहीर केला आहे.

भारतीय नेमबाजपटू अंकुर मित्तलने शुक्रवारी पंतप्रधान सहायचा निधीला १ लाख आणि हरियाणा कोरोना रिलीफ फंडाला ५१ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. मी पंतप्रधान सहायचा निधीला १ लाख आणि हरियाणा कोरोना रिलीफ फंडाला ५१ हजार रुपये देण्याचे वचन देतो. भारत या महामारीचा सामना करू शकतो आणि करेल, असे अंकुरने म्हटले.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहायता निधी स्थापन करण्याची घोषणा केली आणि सर्व देशवासीयांना यासाठी पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन केले. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्यासह विविध खेळाडू देशाला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.