नवी दिल्ली - यंदाच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) भारतीय संघाची घोषणा केली होती. या संघात आघाडीची महिला धावपटू द्युती चंद हिला स्थान देण्यात आलेले नव्हते. मात्र, तिचा आता संघात समावेश केला आहे.
हेही वाचा - विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतून तेजस्वनी शंकरची माघार
कतारमधील दोहा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी २५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. द्युती या स्पर्धेसाठी पात्र झाली नव्हती. तिचा संघातील समावेश हा फक्त एएफआयच्या निर्णयावर अवलंबून होता. 'विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महिलांमध्ये १०० मीटर धावणे प्रकारात द्युती चंद हिला स्थान देण्यात आले आहे', असे एएफआयने ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
Participation of @DuteeChand is confirmed yesterday late evening by AFI to IAAF in Women's 100m #DohaWorldChampionships #doha2019 @g_rajaraman @sportsmurali @nitinarya99 @Media_SAI @uthraGC @Padmadeo @siwachvinay @AkashvaniAIR @BhutaniRahul @timesofindia @TimesNow @Vimalsports pic.twitter.com/sN47uPP7zp
— Athletics Federation of India (@afiindia) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Participation of @DuteeChand is confirmed yesterday late evening by AFI to IAAF in Women's 100m #DohaWorldChampionships #doha2019 @g_rajaraman @sportsmurali @nitinarya99 @Media_SAI @uthraGC @Padmadeo @siwachvinay @AkashvaniAIR @BhutaniRahul @timesofindia @TimesNow @Vimalsports pic.twitter.com/sN47uPP7zp
— Athletics Federation of India (@afiindia) September 12, 2019Participation of @DuteeChand is confirmed yesterday late evening by AFI to IAAF in Women's 100m #DohaWorldChampionships #doha2019 @g_rajaraman @sportsmurali @nitinarya99 @Media_SAI @uthraGC @Padmadeo @siwachvinay @AkashvaniAIR @BhutaniRahul @timesofindia @TimesNow @Vimalsports pic.twitter.com/sN47uPP7zp
— Athletics Federation of India (@afiindia) September 12, 2019
२७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे. भाला फेक प्रकारातील खेळाडू नीरज चोप्रा याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. विक्रमवीर हिमा दास हिला रिले प्रकारात संघात स्थान मिळाले आहे
एएफआयने जाहीर केलेला संघ -
पुरुष : जाबिर एमपी, जिंसन जॉनसन, अविनाश सेबल, के टी इरफान आणि देवेंद्र सिंह, टी. गोपी, एम. श्रीशंकर, तजिंदर पाल सिंह तूर, शिवपाल सिंह, मोहम्मद अनास, निर्मल नाओ टॉम, एलेक्स एंटनी, अमोज जैकब, केएस जीवन, धारुन अय्यास्वामी आणि हर्ष कुमार
महिला : पी यू चित्रा, अन्नू रानी, हिमा दास, विस्मया वीके, पूवम्मा एमआर, जिस्ना मैथ्यू, रेवती वी, सुभावनकत्सन, विथ्या आर.