नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे चाहते अनेकदा विराट कोहलीच्या चांगुलपणाबद्दल बोलतात आणि असे बरेच लोक आहेत, ज्यांना त्याच्या खेळातून प्रेरणा घेऊन विराट कोहलीसारखे बनायचे आहे. विराट कोहलीच्या या खास वैशिष्ट्यामुळे केवळ क्रीडा चाहतेच नाही, तर काही क्रिकेटपटूही आहेत ज्यांना क्रिकेटचा उगवता स्टार म्हणून टीम इंडियामध्ये स्थान निर्माण करायचे आहे. टीम इंडियामध्ये खेळून कोहलीसारखे नाव कमवायचे आहे.
भारताच्या वेगवान गोलंदाजाचे स्वप्न : भारतीय क्रिकेट संघाच्या एका वेगवान गोलंदाजाने असेच स्वप्न पाहिले आहे आणि विराट कोहलीने दिलेले असेच योगदान त्याला भारतीय क्रिकेटमध्ये द्यायचे आहे. हा स्टार गोलंदाज दुसरा-तिसरा कोणी नसून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. एका क्रिकेट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी खुलासा केला आहे की, मोहम्मद सिराज विराट कोहलीच्या टॅलेंटने प्रभावित झाला होता आणि त्याला विराटसारखे बनण्यास साहाय्य करण्यास सांगितले होते. तसेच, त्याने याबाबतीत मदत करण्याची विशेष विनंती केली होती. विराट कोहलीची क्रिकेटमधील विशेष प्रतिभेने तो भारावून गेला होता, त्यामुळे त्याला विराट कोहलीसारखे बनायचे आहे.
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले : टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक असलेले अरुण म्हणाले की, मोहम्मद सिराज विराट कोहलीचा मोठा चाहता होता आणि आरसीबीकडून खेळताना त्याने मला सांगितले होते की त्याला विराट कोहलीसारखे व्हायचे आहे. खेळाडूच्या आतील एवढी उत्सुकता पाहून त्यालाही खूप काही शिकवण्याचा मी विचार केला. त्यानुसार त्याचा सरावदेखील मी करून घेतला.
मोहम्मद सिराजनेसुद्धा कबूल केले : यावर तो म्हणाला- 'नाही सर, मला जे करायचे आहे ते मी करेन. पण, मला त्याच्या मागे जायचे आहे.' मोहम्मद सिराज एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि त्याने 2018 ते 2021 या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर येथे विराट कोहलीसोबत खेळताना आपली प्रतिभा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला दीर्घकाळ अव्वल क्रमांकावर कायम ठेवायचे आहे.
आयपीएल 2023 चे शेड्यूल जाहीर झाले : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या हंगामातही या स्पर्धेत एकूण 74 सामने होणार आहेत. आयपीएलच्या 15व्या हंगामाचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. गुजरात प्रथमच आयपीएलमध्ये खेळला. IPL 2023 चा पहिला सामना गतविजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 31 मार्च रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाणार असून, ही स्पर्धा 12 ठिकाणी खेळवली जाणार आहे.