मुंबई - भारतीय तलवारबाजी संघ टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यात अपयशी ठरला आहे. ताश्कंद येथे आयोजित अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय संघाला संधी होती. पण भारतीय संघाने ती संधी गमावली.
तलवारबाजी संघाच्या प्रशिक्षकांनी सांगितलं की, 'भारतीय तलवारबाजी संघाला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याची अखेरची संधी होती. यामुळे खेळाडू दबावात आले. शांत आणि नैसर्गिक खेळ करण्याऐवजी त्यांनी चूका केल्या. परिणामी ऑलिम्पिकचा कोटा मिळवण्यात ते अपयशी ठरले.'
दोन दिवसीय या स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकसाठी एकूण सहा कोटे होते. यातील तीन महिलांसाठीचे होते.
सुनिल कुमार आणि राधिया अवती यांनी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर इतर खेळाडूंना पहिल्या फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला.
भवानी देवी ही एकमात्र भारतीय आहे. जिने टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे. भवानीने साब्रे इव्हेंटमध्ये क्वालिफाय केलं होते.
हेही वाचा - कौतुकास्पद! १९ वर्षीय गोल्फपटूने आपली कमाई दिली कोविड लसीकरण मोहिमेला
हेही वाचा - CSK VS SRH : हैदराबादचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय