नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कामगिरी केल्यानंतर भारतीय अॅथलिट आज नवी दिल्लीमध्ये पोहोचले. दिल्ली विमानतळावर पदक विजेत्या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा याचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर बजरंग पुनिया, दीपक पुनिया, लवलिना बोर्गोहेन, रवी दहिया याचे देखील स्वागत झालं.
-
🇮🇳 Athletics team is back from #Tokyo2020
— SAIMedia (@Media_SAI) August 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Let's welcome them by sharing our #Cheer4India messages and encourage them for their future competitions. #Olympics #TeamIndia pic.twitter.com/UOubtFBas2
">🇮🇳 Athletics team is back from #Tokyo2020
— SAIMedia (@Media_SAI) August 9, 2021
Let's welcome them by sharing our #Cheer4India messages and encourage them for their future competitions. #Olympics #TeamIndia pic.twitter.com/UOubtFBas2🇮🇳 Athletics team is back from #Tokyo2020
— SAIMedia (@Media_SAI) August 9, 2021
Let's welcome them by sharing our #Cheer4India messages and encourage them for their future competitions. #Olympics #TeamIndia pic.twitter.com/UOubtFBas2
टोकियोतून मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंमध्ये सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा, कास्य पदक विजेता बजरंग पुनिया, रौप्य पदक विजेता रवी दहिया, कास्य पदक विजेती लवलिना बोर्गोहेन, पुरूष हॉकी संघाशिवाय आणखी काही खेळाडू आहेत. पदक विजेता खेळाडू विमानतळावरून अशोका हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांचा सन्मान सोहळा रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे सहभागी होणार आहेत.
भाजप खासदारांनी केलं नीरज चोप्राचे स्वागत
सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा दिल्लीत पोहोचला. तेव्हा भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी नीरजचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले. यावेळी नीरजची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. कडक सुरक्षा ठेऊन देखील बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी नीरज येताच भारता माता की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा - टोकियो संपलं, पॅरिस 2024 साठी नवी सुरूवात - बॉक्सर लवलिना बोर्गोहेन
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकने सिद्ध केलं की डब्ल्यूएचओचा सल्ला योग्य ठरला - आयओसी सल्लागार