ETV Bharat / sports

कोरोनाकाळात भारतीय नेमबाज जोडी अडकली विवाहबंधनात

author img

By

Published : Jul 1, 2020, 1:09 PM IST

बरेच दिवस एकमेंकाना डेट केल्यानंतर 2018 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. दीपिका आणि अतानू यांच्या लग्नपत्रिकेत कोरोना संबंधित सरकारी सूचनांचे अनुसरण करण्याची विनंती करण्यात आली होती. लग्नाच्या वेळी मास्क, सॅनिटायझर्स आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या.

Indian archer couple deepika kumari and atanu das tied the knot
कोरोनाकाळात भारतीय नेमबाज जोडी अडकली विवाहबंधनात

नवी दिल्ली - अव्वल भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतानू दास विवाहबंधनात अडकले आहेत. मंगळवारी रात्री रांचीच्या मोराबाडी येथे हा विवाहसोहळा पार पडला. या मंगल कार्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. या नवविवाहित जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही दाखल झाले.

बरेच दिवस एकमेंकाना डेट केल्यानंतर 2018 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. दीपिका आणि अतानू यांच्या लग्नपत्रिकेत कोरोना संबंधित सरकारी सूचनांचे अनुसरण करण्याची विनंती करण्यात आली होती. लग्नाच्या वेळी मास्क, सॅनिटायझर्स आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या.

  • International Indian archers Deepika Kumari and Atanu Das today tied nuptial knot in Morabadi in Ranchi, following all social distancing norms during the low-key wedding ceremony.
    Jharkhand CM Hemant Soren blessed the newly wedded couple pic.twitter.com/zBRVfyqKJp

    — All India Radio News (@airnewsalerts) June 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संध्याकाळी रिसेप्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी पाहुण्यांना दोन विविध वेळा देण्यात आल्या. यावेळी कुटुंबातील सदस्य घरी होते. पहिली 50 जणांची तुकडी सायंकाळी 5:30 ते सायंकाळी 7 तर, उर्वरित पाहुणे नंतर आले.

तत्पूर्वी झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनीही या सोहळ्याला उपस्थिती नोंदवली. यापूर्वी हे जोडपे 2019 मध्ये लग्न करणार होते, परंतु काही कारणास्तव ते पुढे ढकलले गेले. त्यानंतर या दोघांनी ऑलिम्पिकनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोरोनाव्हायरसमुळे ऑलिम्पिक एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.