ETV Bharat / sports

दक्षिण आशियाई स्पर्धा : पाचव्या दिवशी भारताने जिंकली ४१ पदके

शुक्रवारी भारतासाठी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्ण पदके जिंकली. अश्मिता चालिहा आणि सिरिल वर्मा यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन सामन्यात सुवर्णपदके जिंकली. यासह ध्रुव कपिलाने पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी यश संपादन केले.

india won 41 medals on day five in south asian games

author img

By

Published : Dec 7, 2019, 1:00 PM IST

काठमांडू - बॅडमिंटनपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताने १९ सुवर्णांसह ४१ पदके जिंकली आणि अव्वल स्थान मजबूत केले आहे. या स्पर्धेत भारताने एकूण १६५ पदके मिळवली असून त्यात ८१ सुवर्ण, ५९ रौप्य व २५ कांस्यपदकांचा समावेश आहे.

हेही वाचा - 'या' विक्रमात हिटमॅनपेक्षा विराटच भारी...तुम्हीच पाहा काय सांगते आकडेवारी

शुक्रवारी भारतासाठी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्ण पदके जिंकली. अश्मिता चालिहा आणि सिरिल वर्मा यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन सामन्यात सुवर्णपदके जिंकली. यासह ध्रुव कपिलाने पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी यश संपादन केले.

या स्पर्धेतील पदकांच्या यादीत यजमान नेपाळ ४१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ४८ कांस्यपदकांसह दुसऱ्या तर, श्रीलंका १३४ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

वुशुमध्ये भारताचा दबदबा -

तत्पूर्वी, पुरुष वुशु अष्टपैलू स्पर्धेत सूरज सिंगने पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यापाठोपाठ वाई सँथोई देवी (महिला ५२ किलो), पूनम (महिला ७५ किलो), दीपिका (महिला ७० किलो), सुशीला (महिला ६५ किलो), रोशिबिना देवी (महिला ६० किलो) आणि सुनील सिंग ( पुरूष ५२ किलो) यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. विद्यापति चानूने महिलांच्या ५६ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

Intro:Body:

india won 41 medals on day five in south asian games

south asian games latest news, india medals in south asian games news, india 165 medals in sa games news, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा न्यूज, day five in south asian games news, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 5 वा दिवस न्यूज 

दक्षिण आशियाई स्पर्धा : पाचव्या दिवशी भारताने जिंकली ४१ पदके

काठमांडू - बॅडमिंटनपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताने १९ सुवर्णांसह ४१ पदके जिंकली आणि अव्वल स्थान मजबूत केले आहे. या स्पर्धेत भारताने एकूण १६५ पदके मिळवली असून त्यात ८१ सुवर्ण, ५९ रौप्य व २५ कांस्यपदकांचा समावेश आहे.

हेही वाचा - 

शुक्रवारी भारतासाठी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्ण पदके जिंकली. अश्मिता चालिहा आणि सिरिल वर्मा यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन सामन्यात सुवर्णपदके जिंकली. यासह ध्रुव कपिलाने पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी यश संपादन केले.

या स्पर्धेतील पदकांच्या यादीत यजमान नेपाळ ४१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ४८ कांस्यपदकांसह दुसऱ्या तर, श्रीलंका १३४ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे. 

वुशुमध्ये भारताचा दबदबा -

तत्पूर्वी, पुरुष वुशु अष्टपैलू स्पर्धेत सूरज सिंगने पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यापाठोपाठ वाई सँथोई देवी (महिला ५२ किलो), पूनम (महिला ७५ किलो), दीपिका (महिला ७० किलो), सुशीला (महिला ६५ किलो), रोशिबिना देवी (महिला ६० किलो) आणि सुनील सिंग ( पुरूष ५२ किलो) यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. विद्यापति चानूने महिलांच्या ५६ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.