नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता सायप्रस येथे होणाऱ्या आगामी नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेतून भारताने आपले नाव मागे घेतले आहे. ४ ते १३ मार्च दरम्यान रंगणाऱ्या शॉटगन विश्वकरंडक स्पर्धेला आंतरराष्ट्रीय शूटींग फेडरेशनने (आयएसएसएफ) मान्यता दिली आहे.
हेही वाचा - अवघ्या १२ धावात घेतले १० बळी...पाहा व्हिडिओ
सरकारच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या (आयएसएसएफ) सूत्रांनी पीटीआयला सांगितले आहे. कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमध्ये झाली असून यामुळे, ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर, ८० हजार लोकं जगभरात बाधित आहेत. आशियात भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये तसेच, अमेरिका, युरोपातील इटली, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.
१६ ते २६ मार्च दरम्यान डॉ. करणी सिंग श्रेणीत भारत विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करणार आहे.