ETV Bharat / sports

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषकात भारताचे यश, ज्योती-देवताले जोडीने मिश्र सांघिक स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील मिश्र सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय जोडीने चायनीज तैपेई संघाचा पराभव करत सुवर्णपदकावर कब्जा केला आहे.

INDIA WINS GOLD IN ARCHERY WORLD CUP
तिरंदाजी विश्वचषकात भारताने सुवर्णपदक जिंकले
author img

By

Published : Apr 22, 2023, 9:15 PM IST

अंताल्या (तुर्की) : ज्योती सुरेखा वेण्णम आणि तिचा जोडीदार ओजस देवतळे यांनी शनिवारी चायनीज तैपेईचा 159-154 असा पराभव करत तुर्कीच्या अंताल्या येथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या विजयासह त्यांनी या स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. मिश्र कंपाउंड प्रकारातील विश्वचषकात भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. या आधी, ज्योती आणि अभिषेक वर्मा यांनी पॅरिसमध्ये 2022 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यात सुवर्णपदक जिंकले होते.

अंतिम फेरीत सहज विजय मिळवला : राष्ट्रीय चाचण्यांमध्ये संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या वर्माच्या अनुपस्थितीनंतरही, भारतीय जोडीने अंतिम फएरीत एकतर्फी विजय मिळवला. या दोघांनी अंतिम फेरीत 12 व्या मानांकित चायनीज तैपेईच्या प्रतिस्पर्ध्यांना एकही चान्स दिला नाही. भारतीय जोडीने 16 पैकी 15 लक्ष्य गाठून ऐतिहासिक कामगिरी केली. ज्योती आणि 20 वर्षीय ओजस देवतळे या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने अंतिम सामन्यात केवळ एक गुण गमावला, अन्यथा त्यांचा स्कोअर 160 पैकी 160 झाला असता. ज्योती आणि देवतळे यांनी सलग 'परफेक्ट 10' गोल केले आणि लवकरच 120 - 116 अशी आघाडी घेतली. यानंतरही त्यांनी आपली चांगली कामगिरी सुरू ठेवत सहजरित्या प्रथम क्रमांक पटकावला.

भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाचा अंतिम फेरीत प्रवेश : यापूर्वी, भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने गुरुवारी येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक पहिल्या टप्प्यात तीन विजय नोंदवत नऊ वर्षांत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अतनु दास, बी धीरज आणि तरुणदीप राय या त्रिकुटाचा रविवारी सुवर्णपदकाच्या लढतीत चीनशी सामना होणार आहे. भारताने विजेतेपद पटकावल्यास विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत 13 वर्षांनंतरचे हे पहिले सुवर्णपदक असेल.

हे ही वाचा : IPL 2023 : CSK ला आणखी एक धक्का, बेन स्टोक्स कोलकाता आणि राजस्थान विरुद्धच्या सामन्यातून बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.