ETV Bharat / sports

बॉक्सिंग : भारताच्या महिला बॉक्सिंगपटूंचा राष्ट्रीय चषक स्पर्धेत डंका, जिंकली १२ पदके

author img

By

Published : Aug 19, 2019, 8:39 PM IST

या स्पर्धेत, भारताकडून १३ बॉक्सिंगपटूंनी भाग घेतला होता. त्यापैकी, १२ बॉक्सिंगपटूंनी पदके कमावली आहेत. ४८ किलो वजनी गटात भारताच्या तमन्नाने सर्वोत्कृष्ट विदेशी बॉक्सिंगपटूचा मान पटकावक सुवर्णपदक पटकावले.

बॉक्सिंग : भारताच्या महिला बॉक्सिंगपटूंचा राष्ट्रीय चषक स्पर्धेत डंका, जिंकली १२ पदके

सर्बिया - भारताच्या ज्यूनियर महिला बॉक्सिंगपटूंनी सर्बिया येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय चषक स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली. भारताने या स्पर्धेत, चार सुवर्णपदकासह १२ पदकांची कमाई केली आहे.

या स्पर्धेत, भारताकडून १३ बॉक्सिंगपटूंनी भाग घेतला होता. त्यापैकी, १२ बॉक्सिंगपटूंनी पदके कमावली आहेत. ४८ किलो वजनी गटात भारताच्या तमन्नाने सर्वोत्कृष्ट विदेशी बॉक्सिंगपटूचा मान पटकावक सुवर्णपदक पटकावले. तिने रशियाच्या अलेना ट्रेमासोवाचा ५-० ने पराभव केला.

५७ किलो वजनी गटात अंबेशोरीने, ६० किलो वजनी गटात प्रिती दाहिया, ६६ किलो वजनी गटात प्रियांका या बॉक्सिंगपटूंनी सुवर्णपदक पटकावले आहे. भाग घेतलेल्या १३ बॉक्सिंगपटूंपैकी रागिणीला कोणतेही पदक पटकावता आले नाही. २० देशांतील १६० बॉक्सिंगपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.