नवी दिल्ली : आयसीसी ICC महिला T20 विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्व गट टप्प्यातील सामने खेळले गेले आहेत. आता उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना होणार आहे. पहिला उपांत्य सामना भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवार, 23 फेब्रुवारी रोजी केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर होणार आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना शुक्रवारी 24 फेब्रुवारी रोजी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका महिला संघामध्ये होणार आहे. यानंतर कोणता संघ अंतिम फेरीपर्यंत आपला प्रवास टिकवून ठेवणार हे पाहावे लागेल.
टीम इंडियाचा पहिल्यांदाच विश्वकप जिंकण्यासाठी लढा : टीम इंडिया पहिल्यांदाच महिला T20 चे विजेतेपद जिंकण्यासाठी लढा देत आहे. या टुर्नामेंटमध्ये खेळल्या गेलेल्या ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये सर्वात जास्त धावा आणि विकेट्स कोणी घेतल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तसेच आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर काय आहे. महिला T20 विश्वचषक स्पर्धेत दोन गटांत विभागलेल्या 10 संघांमध्ये एकूण 20 सामने खेळले गेले आहेत. या दहा संघांपैकी प्रत्येकाच्या वाट्याला 4-4 सामने होते. ग्रुप स्टेजचे सामने झाले. या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त धावा आणि विकेट घेण्यापासून जाणून घ्या कोणते खेळाडू अव्वल स्थानावर राहिले आहेत.
सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आणि संघाची धावसंख्या : 1. इंग्लंडच्या महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट गमावून 213 धावांची मोठी धावसंख्या उभारली. 2. धावांच्या बाबतीत इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध ११४ धावांच्या मोठ्या फरकाने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. विकेट्सच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय म्हणजे श्रीलंकेला 25 चेंडू बाकी असताना 10 विकेट्सने पराभूत करणे. 3. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत इंग्लंडची अष्टपैलू नॅट सिव्हर अव्वल स्थानावर आहे. तिने 4 सामन्यांत 88.4 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या मुनीबा अलीने सर्वोत्तम खेळी केली आहे. तिने आयर्लंडविरुद्ध 68 चेंडूत 102 धावा केल्या आहेत. यासह मुनिबा या स्पर्धेत शतक करणारी एकमेव खेळाडू ठरली आहे.
या फलंदाजाने ठोकले सर्वाधिक षटकार : 5. भारतीय फलंदाज स्मृती मंधाना हिने या स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. 6. भारताची रिचा घोष सर्वाधिक फलंदाजी सरासरीमध्ये पुढे आहे. रिचा 122 च्या सरासरीने धावा करीत आहे. ऋचाने तीन नाबाद डाव खेळताना 4 डावात एकूण 122 धावा केल्या आहेत. 7. सर्वाधिक विकेट्स घेण्यात इंग्लंडची गोलंदाज सोफी एकेलस्टर आघाडीवर आहे. तिने 4 सामन्यांत 61 धावांत 8 बळी घेतले आहेत. 8. सर्वोत्तम गोलंदाजी डावात ऑस्ट्रेलियाची ऍशले गार्डनर अव्वल स्थानावर आहे. तिने न्यूझीलंडविरुद्ध 3 षटकांत 12 धावा देऊन 5 विकेट घेतल्या आहेत. 9. भारताची सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक रिचा घोष हिने आतापर्यंत 6 जणांना बाद केले आहे. ज्यात एक स्टंपिंग आहे. 10. दक्षिण आफ्रिकेच्या वोल्वार्ड आणि ब्रिट्स यांनी डावातील सर्वात मोठी भागीदारी केली आहे. दोन्ही खेळाडूंनी बांगलादेशविरुद्ध 117 धावांची खेळी केली.