ETV Bharat / sports

Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकातील आजचे सामने, उपांत्यपूर्व फेरीसाठी या चार संघांमध्ये लढत

15 व्या हॉकी विश्वचषकात आज चार संघ क्रॉसओव्हर सामन्यांमध्ये एकमेकांशी भिडतील. यातील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. कालच्या क्रॉसओव्हर सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंड आणि स्पेनचे संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.

Hockey World Cup
हॉकी विश्वचषक
author img

By

Published : Jan 23, 2023, 10:21 AM IST

भुवनेश्वर (ओडिशा) : हॉकी विश्वचषक 2023 च्या क्रॉसओव्हर स्टेजला सुरुवात झाली आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या क्रॉसओव्हर सामन्यात स्पेनने मलेशिया आणि न्यूझीलंडने भारताचा पराभव करून दोन्ही संघांना उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून बाहेर पाडले आहे. स्पेनने मलेशियावर ४-३ अशी मात केली तर न्यूझीलंडने भारताचा 5-4 असा पराभव केला. स्पेनचा संघ आता मंगळवारी पूल अ मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या बेल्जियमशी २४ जानेवारीला (मंगळवारी) मुकाबला होईल.

आजचा क्रॉसओवर सामना : भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर दोन क्रॉसओव्हर सामने खेळवले जातील. पहिला सामना जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात दुपारी 4:30 वाजता होईल. त्याच वेळी, दुसरा सामना अर्जेंटिना आणि कोरिया यांच्यात संध्याकाळी सात वाजता होईल. जागतिक क्रमवारीत जर्मनीचा संघ चौथ्या तर फ्रान्सचा संघ 12व्या क्रमांकावर आहे. जर्मनीने ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने खेळले, त्यापैकी दोन जिंकले तर एक सामना अनिर्णित राहिला. त्याचवेळी, फ्रान्सने ग्रुप स्टेजमध्ये तीनपैकी एक सामना जिंकला तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. फ्रान्सचा एक सामना अनिर्णित राहिला. हॉकी विश्वचषकाचा दुसरा क्रॉसओव्हर सामना अर्जेंटिना आणि कोरिया यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ 11व्यांदा आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 10 सामने झाले असून त्यात अर्जेंटिनाने सात तर कोरियाने एक सामना जिंकला आहे. या दोघांमध्ये खेळलेले दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. विश्वचषकात दोन्ही संघ चौथ्यांदा आमनेसामने येणार आहेत.

जर्मनी विरुद्ध फ्रान्स हेड टू हेड : जर्मनी आणि फ्रान्समध्ये आतापर्यंत 12 सामने झाले आहेत. या खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये जर्मनीने आपले वर्चस्व राखले आहे. दोन्ही संघांंमध्ये झालेल्या सर्व सामन्यांमध्ये जर्मनीने फ्रान्सचा पराभवाची केला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत जर्मनीने फ्रान्सचा तीन वेळा पराभव केला. मात्र विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. या दोन संघापैकी जो संघ जिंकेल तो उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल.

न्यूझीलंडकडून भारताचा पराभव : रविवारी क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा 4-5 अशा फरकाने पराभव केला. या पराभवासह भारत हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून भारत बाहेर पडला आहे. नियमित वेळेत सामना ३-३ असा बरोबरीत सुटला होता. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पूर्वार्धात एका टप्प्यावर भारताकडे २-० अशी आघाडी होती मात्र त्यानंतर न्यूझीलंडने सामन्यात पुनरागमन केले.

हेही वाचा : ICC Awards 2022 : आयसीसी पुरस्कार 2022, टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंना मिळाले नामांकन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.