ETV Bharat / sports

Hockey World Cup 2023 : भारताचा पहिला सामना स्पेन विरुद्ध, दिग्गज खेळाडूंनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा - बिरसा मुडा स्टेडियम

हॉकी विश्वचषक 2023 मध्ये भारत आपल्या मोहिमेची सुरुवात स्पेनविरुद्ध करणार आहे. राउरकेलाच्या बिरसा मुडा स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 48 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करू इच्छितो.

Hockey World Cup 2023
हॉकी विश्वचषक 2023
author img

By

Published : Jan 13, 2023, 7:31 PM IST

भुवनेश्वर : ओडिशातील भुवनेश्वर आणि राउरकेला येथे आजपासून १५व्या हॉकी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. हॉकीच्या या महासंग्रामात जगातील 16 देश जगज्जेते होण्यासाठी धडपडणार आहेत. विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अ गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, अर्जेंटिना, ब गटात बेल्जियम, जपान, कोरिया, जर्मनी, क गटात नेदरलँड, चिली, मलेशिया, न्यूझीलंड आणि ड गटात भारत, वेल्स, स्पेन, इंग्लंड हे संघ आहेत.

भारताचा सामना स्पेन विरुद्ध : रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ आज संध्याकाळी सात वाजता स्पेनशी भिडणार आहे. राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियम वर हा सामना खेळला जाईल. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाकडून यावेळी विश्वचषकात चांगली कामगिरी अपेक्षित आहे. भारताचा पहिला सामना 13 जानेवारीला स्पेन, 15 जानेवारीला इंग्लंड आणि 19 जानेवारीला वेल्सशी होणार आहे. 17 दिवस चालणाऱ्या या हॉकीच्या महाकुंभात 44 सामने होणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये 24 सामने होणार आहेत.

  • My best wishes to our Indian men's hockey team for the World Cup. Go and enjoy yourself, we all are backing you. Good luck. 🇮🇳💪

    — Virat Kohli (@imVkohli) January 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विराट, सचिन, लक्ष्मण यांनी शुभेच्छा दिल्या : सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंनी भारतीय हॉकी संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने लिहिले आहे की, 'हॉकी विश्वचषकासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा. आम्ही सर्व तुमचा जय-जयकार करू. चक दे इंडिया'. विराट कोहलीने लिहिले की, 'विश्वचषकासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला माझ्या शुभेच्छा. आम्ही सर्व तुम्हाला पाठिंबा देत आहोत. तुम्हाला यश मिळो. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला, 'टीम इंडियाच्या भरपूर यशाची कामना, चला संघाचा उत्साह वाढवूया'.

  • Wishing the Indian Men's Hockey Team all the very best for the Hockey World Cup.

    We'll all be cheering for you!
    Chak De! 🏑 🇮🇳@TheHockeyIndia

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) January 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताचे विश्वचषकात 199 गोल : भारतीय संघ 15व्यांदा हॉकी विश्वचषकात सहभागी होत आहे. भारतीय खेळाडूंनी विश्वचषकात आत्तापर्यंत 199 गोल केले आहेत. स्पेनविरुद्ध एक गोल करताच भारताचे विश्वचषकात गोलचे द्विशतक पूर्ण होईल. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलिया 305 गोलांसह पहिल्या तर नेदरलँड्स 267 गोलांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या विश्वचषकात भारताचा हा 96 वा सामना आहे.

भारतीय संघ :

गोलरक्षक - कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश

बचावपटू - जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप

मिडफिल्डर - मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग

फॉरवर्ड - मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजित सिंग

पर्यायी खेळाडू - राजकुमार पाल, जुगराज सिंग

हेही वाचा : India vs Sri lanka 2nd ODI : भारताचा श्रीलंकेवर चार गड्यांनी विजय ; केएल राहुल, सिराज आणि कुलदीपची चमकदार कामगिरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.