नवी दिल्ली - भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिने आसाममध्ये आलेल्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून आपली अर्धी पगार देण्याचे जाहीर केले आहे. तिने एक ट्विट करत यांची घोषणा केली. हिमा दास चेक गणराज्यमध्ये सुरू असलेल्या क्लांदो मेमोरियल अॅथलॅटिक्स मीट स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे.
-
I have contributed my bit and requesting others also to please help people of Assam. #AssamFloods https://t.co/y7ml1EMGzG
— Hima MON JAI (@HimaDas8) July 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I have contributed my bit and requesting others also to please help people of Assam. #AssamFloods https://t.co/y7ml1EMGzG
— Hima MON JAI (@HimaDas8) July 16, 2019I have contributed my bit and requesting others also to please help people of Assam. #AssamFloods https://t.co/y7ml1EMGzG
— Hima MON JAI (@HimaDas8) July 16, 2019
ब्रम्हपुत्रा नदीला पूर आल्याने, आसाममधील ३० जिल्ह्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे तब्बल 43 लाख लोक बाधित झाले असून 80 हजार हेक्टर पिके पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. यामुळे आसामचीच रहिवाशी असलेल्या हिमा दास हिने आपली अर्धी पगार देण्याचे जाहीर केले.
हिमा दास हिने मदतीची रक्कम मुख्यमंत्री मदत फंडामध्ये जमा केली आहे. तसेच हिमा दास हिने मोठ्या कंपन्या तसेच नागरिकांना आसामला मदत करा, असे आवाहन केले आहे.
मागील पंधरवड्यात हिमा दास हिने भारतासाठी तब्बल ३ सुवर्णपदक जिंकले होते. हिमा दास खेळाडू कोट्यामधून गुवाहाटीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये एचआर (मनुष्यबळ अधिकारी) ऑफिसर म्हणून काम पाहते.