नवी दिल्ली - भारताची विक्रमवीर आणि आघाडीची धावपटू हिमा दासने आपला विजयी धडाका कायम ठेवला आहे. चेक गणराज्य येथे सुरु असलेल्या यंदाच्या एथलेटिकी मिटिनेक रीटरमध्ये हिमाने सुवर्णपदक जिंकले आहे.
-
Finished on the top in 300 m in the Athleticky Mitink Reiter 2019 today in Czech Republic pic.twitter.com/yY0yO5xTfb
— Hima MON JAI (@HimaDas8) August 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Finished on the top in 300 m in the Athleticky Mitink Reiter 2019 today in Czech Republic pic.twitter.com/yY0yO5xTfb
— Hima MON JAI (@HimaDas8) August 17, 2019Finished on the top in 300 m in the Athleticky Mitink Reiter 2019 today in Czech Republic pic.twitter.com/yY0yO5xTfb
— Hima MON JAI (@HimaDas8) August 17, 2019
हिमाने महिलांच्या ३०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर, भारताच्याच मोहम्मद अनासनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. यंदासाठी अर्जुन पुरस्कारासाठी निवड झालेल्या अनासने पुरुषांच्या ३०० मीटरमध्ये हे पदक जिंकले.
हिमाने आणि मोहम्मद अनासने ट्विटरवर या कामगिरीची माहिती दिली. 'हा आनंद एथलेटिकी मिटिनेक रीटरमध्ये ३२.४१ सेकंदासह सुवर्णपदक जिंकण्याचा आहे', असे अनासने म्हटले आहे. तर, दोन जुलैनंतर हिमा दासचे हे युरोपमधील सहावे सुवर्णपदक आहे. पुरुषांमध्ये अनास व्यतिरिक्त, निर्मल टॉमने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ३३.०३ सेकंदासह तो या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिला आहे.