चेन्नई - 22 जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2020 मध्ये ग्रँडमास्टर विदित गुजराथी भारताचे नेतृत्व करणार आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या (एआयसीएफ) निवेदनानुसार, माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि निवड समितीशी चर्चा केल्यानंतर एआयसीएफचे अध्यक्ष पीआर वेंकटरम राजा यांनी हा निर्णय घेतला.
जागतिक क्रमवारीत आनंद 15 व्या आणि गुजराती 23 व्या स्थानी आहे. जगातील 26 व्या क्रमांकाचा खेळाडू जीएम पंतला हरिकृष्णा हा संघात राखीव खेळाडू असेल.
भारतीय 2020 ऑलिम्पियाड संघ -
पुरुष : विश्वनाथन आनंद, विदित संतोष गुजराथी (कर्णधार), पी. हरिकृष्णा (राखीव) आणि अरविंद चिदंबरम (राखीव).
महिला संघ: कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका, भक्ती कुलकर्णी (राखीव) आणि आर. वैशाली (राखीव).
कनिष्ठ मुले: निहाल सरीन, आर. प्रज्ञानानंद (राखीव).
कनिष्ठ मुली: दिव्या देशमुख, वांटिका अग्रवाल (राखीव).