मुंबई - उदयपूरची 'जलपरी' गौरवी सिंघवी हिने शुक्रवारी ब्रिटीश खाडी पार करुन नवा 'किर्तीमान' स्थापन केला आहे. १६ वर्षीय गौरवी ही ब्रिटीश खाडी पार करणारी यंदाच्या वर्षातील पहिली युवा जलतरणपटू ठरली. तिने ३८ किलोमीटरचे अंतर १३ तास २६ मिनिटात पूर्ण करत देशाचे नाव मोठे केले.
हेही वाचा - पाकिस्तान खोटारडा... भारतावर आरोप करणाऱ्या पाकला श्रीलंकेचे खडेबोल
भारतात पहाटेच्या वेळी सगळे झोपलेले होते. तेव्हा लंडनमध्ये पहाटे अडीच ते दुपारी तीनच्या सुमारास गौरवी हिने लहानपणी पाहिलेले स्वप्न खुल्या डोळ्यांनी पूर्ण झाले होते. ब्रिटीश खाडीच्या प्रवासात गौरवीने धैर्याने समुद्राच्या जोरदार लाटांचा सामना करत आपले लक्ष्य पूर्ण केले. गौरवी २०१९ मध्ये जगातील सर्वात कठीण 'ब्रिटीश खाडी' पार करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू ठरली आहे.
हेही वाचा - India vs South Africa : 'या' दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा, रोहितचे कमबॅक?
गौरवी ११ जुलैपासून लंडनमध्ये राहिली आणि तिने गिनीज रेकॉर्ड धारक केविन ब्लिक, निक एडम यांच्याकडून पोहण्याचे धडे घेतले. याच मार्गदर्शनातून १७ डिग्री तापमान असलेल्या पाण्यात पोहून तिने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. दरम्यान, गौरवी सिंघवी हिने या अगोदरही जुहू ते गेटवे हे अंतर ९ तास २२ मिनिटात पार केले होते. गौरवीने केलेल्या विक्रमानंतर तिच्यावर कौतुकाचे वर्षाव होत आहे.