लंडन - एफ-१ वर्ल्ड चॅम्पियन ब्रिटनच्या लुईस हॅमिल्टनने यंदाच्या हंगामासाठी आपला संघ मर्सिडीजसोबत एक नवीन करार केला आहे. एका वृत्तानुसार, मर्सिडीज आणि हॅमिल्टन यांच्यात गेल्या वर्षी अखेरचा वर्षाचा करार झाला होता आणि आता त्यांनी संघाबरोबर नवीन एक वर्षाचा करार केला आहे. या करारानंतर तो २०२१च्या हंगामापर्यंत मर्सिडीजसोबत राहील.
३६ वर्षीय हॅमिल्टनचा मर्सिडीज संघासह हा नववा हंगाम आहे. त्याने गेल्या वर्षी सर्वाधिक रेस जिंकण्याच्या विक्रमात जर्मनीच्या मायकेल शुमाकरला मागे टाकले. शिवाय त्याने शुमाकरच्या सर्वाधिक सात वेळा एफ-१ विजेतेपदाच्या विक्रमाची केली.
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कडक नियमावली जाहीर
हॅमिल्टन म्हणाला, "आमच्या संघाने एकत्र मिळून अविश्वसनीय गोष्टी साध्य केल्या आहेत. आम्हाला अजून यश मिळवायचे आहे आणि ट्रॅकवर सतत पुढे राहायचे आहे." हॅमिल्टनने आतापर्यंत एकूण सात एफ-१ विजेतेपदे जिंकली आहेत. त्यापैकी त्याने सहा मर्सिडीजसाठी जिंकली आहेत. त्याने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत एकूण ९२ एफ-१ शर्यती जिंकल्या आहेत. यापैकी ७१ शर्यती त्याने मर्सिडीजसाठी जिंकल्या आहेत.
मर्सिडीजला सलग सातवे सांघिक जेतेपद -
हॅमिल्टन याने एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्सचा किताब आपल्या नावावर केला. या विजयासह हॅमिल्टनने आपल्या संघाला म्हणजेच मर्सिडीजला सलग सातवे सांघिक जेतेपद मिळवून दिले होते. मर्सिडीजचा संघ सलग सात विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला. त्यांनी फेरारीचा सलग सहा विजेतेपदाचा विक्रमही मोडला. फेरारीने १९९९ ते २००४ या काळात अनुभवी मायकेल शूमाकरसह सलग सहा विजेतेपदे जिंकली होती.