ETV Bharat / sports

2021 मध्ये होणारी फुकौका वर्ल्ड चॅम्पियनशिप स्थगित

author img

By

Published : May 4, 2020, 7:26 PM IST

जपानमधील फुकौका येथे होणारी ही स्पर्धा आता 13 ते 29 मे 2022 पर्यंत आयोजित केली जाईल. कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2021 मध्ये होणार आहे. त्यानंतर, या स्पर्धेचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

FINA postponed the fukuoka world championships till 2022
2021 मध्ये होणारी फुकौका वर्ल्ड चॅम्पियनशिप स्थगित

लुसाने - जागतिक जलतरण संस्था फिनाने 2021 मध्ये होणारी एक्वेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा एका वर्षासाठी तहकूब करण्याची घोषणा केली आहे. जपानमधील फुकौका येथे होणारी ही स्पर्धा आता 13 ते 29 मे 2022 पर्यंत आयोजित केली जाईल.

कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2021 मध्ये होणार आहे. त्यानंतर, या स्पर्धेचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फिनाचे अध्यक्ष ज्युलिओ सी. मॅगॅलोयिन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की संबंधित पक्षांशी बोलणी करून आणि त्यांच्याकडून अभिप्राय मिळाल्यानंतर घेतलेल्या निर्णयामुळे चॅम्पियनशिपमधील सर्व सहभागींना उत्तम आयोजन मिळेल यात शंका नाही.

जपानमधील क्युशु येथे 31 मे ते 9 जून 2022 या कालावधीत मास्टर्स चॅम्पियनशिप आयोजित केली जाईल, असेही संघटनेने जाहीर केले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.