रांची IND vs USA FIH Women Olympic Qualifier : भारतीय महिला हॉकी संघाला ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात निराशेचा सामना करावा लागला. या सामन्यात अमेरिकेनं भारतीय संघाचा 0-1 ने पराभव केला. दरम्यान, भारतीय संघ आज (14 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. तर अमेरिकेचा सामना आज इटलीशी होणार आहे.
यापूर्वी झालेले सामने : रांचीच्या मरंग गोमके येथील जयपाल सिंग स्टेडियममध्ये झालेल्या एफ.आय.एच. ऑलिम्पिक पात्रता महिला हॉकी सामन्यात भारताला अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. शनिवारी पहिला सामना जर्मनी आणि चिली यांच्यात झाला. यामध्ये जर्मनीनं चिलीचा 3-0 ने पराभव केला. दुसरा सामना जपान आणि चेक प्रजासत्ताक यांच्यात झाला. यामध्ये जपान संघानं चेक प्रजासत्ताकचा 2-0 ने पराभव केला. त्यानंतर तिसरा सामना न्यूझीलंड आणि इटली यांच्यात झाला. यावेळी न्यूझीलंडने इटलीचा 3-0 ने पराभव केला.
अमेरिकेनं भारतीय संघाचा पराभव केला : तीन सामन्यांनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात चौथा सामना सुरू झाला. सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना पाहण्यासाठी झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे देखील आले होते. यावेळी त्यांनी दोन्ही संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांना सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामना सुरू झाल्यापासूनच अमेरिकेनं भारतीय संघावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. अखेर अमेरिकेनं भारतीय संघाचा 0-1 ने पराभव केला.
दरम्यान, यावेळी सामना पाहण्यासाठी आलेले झारखंडचे मंत्री मिथिलेश ठाकूर म्हणाले की, ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या आयोजनातून हे लक्षात येतंय की राज्य सरकार राज्यातील युवकांसाठी चांगले काम करत करत आहे. तसंच ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पाठवलेल्या आठव्या समन्सवर मंत्री मिथिलेश ठाकूर म्हणाले की, 29 डिसेंबर 2019 पासूनच सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु राज्यातील जनतेला सर्व सत्य कळलंय. त्यामुळं येत्या निवडणुकीत राज्यातील जनता पुन्हा एकदा भाजपाला उत्तर देईल.
हेही वाचा -
- Indian Hockey Coach Reid : भारतीय संघ हॉकी विश्वचषकाचा प्रमुख दावेदार, संघाचे प्रशिक्षक रीड यांनी मुलाखतीत केला विश्वास व्यक्त
- Women Asian Champions Trophy 2023 Final : आशियाई महिला चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचा कब्जा; जपानचा दणदणीत पराभव
- women hockey team : ऑलिम्पिकमधील परफॉर्मन्स आगामी खेळांत मदत करेल - कर्णधार राणी रामपाल