ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : कॅमरूनचा ब्राझीलवर ऐतिहासिक विजय, तरीही स्पर्धेबाहेर ; स्वित्झर्लंडचे अंतिम 16 मध्ये स्थान निश्चित - Cameroon

फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup 2022) स्वित्झर्लंडने सर्बियाचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा बाद फेरीत प्रवेश केला. (Switzerland beat Serbia). तर कॅमेरूनचा संघ ब्राझीलचा 1-0 ने पराभव करून देखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे. (Cameroon beat Brazil).

FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022
author img

By

Published : Dec 3, 2022, 3:37 PM IST

दोहा : कतार येथे सुरू असलेल्या 22व्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील (FIFA World Cup 2022) गट जी मध्ये स्वित्झर्लंडने सर्बियाचा 3-2 असा पराभव करून बाद फेरीत स्थान निश्चित केले आहे. (Switzerland beat Serbia). या विजयानंतर स्वित्झर्लंडने गटात दुसरे स्थान पटकावले आहे. स्वित्झर्लंडच्या संघाने सलग तिसऱ्यांदा बाद फेरीत प्रवेश केला असून आता 7 डिसेंबर रोजी अंतिम 16 फेरीत त्यांचा सामना पोर्तुगालशी होणार आहे.

सामन्यात सतत चढ-उतार : झेर्डन शकिरीने स्वित्झर्लंडला सुरुवातीला आघाडी मिळवून दिली. परंतु सर्बियाने 10 मिनिटांतच अलेक्झांडर मिट्रोविच आणि दुसान व्लाहोविच यांच्या दोन गोलने सामन्यात कमबॅक केला. मध्यांतरापूर्वी ब्रिएल एम्बोलोने गोल करत मॅच पुन्हा बरोबरीत आणली. दुसऱ्या हाफमध्ये रेमो फ्रीलरने गोल करत स्वित्झर्लंडला एक गोलची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सर्बियाला मोडता आला नाही आणि त्यांना 3-2 ने पराभवाचा सामना करावा लागला.

ऐतिहासिक विजयानंतरही कॅमेरून स्पर्धेबाहेर : दुसरीकडे कॅमेरून ब्राझीलला 1-0 ने पराभूत करून देखील अंतिम 16 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. (Cameroon beat Brazil). स्वित्झर्लंडने सर्बियाचा पराभव केल्यामुळे कॅमेरून बाद फेरीत जाण्यात अपयशी ठरला. ब्राझीलने गटात अव्वल स्थान पटकावले असून स्वित्झर्लंड दुसऱ्या स्थानी राहिला. अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या मिनिटाला व्हिन्सेंट अबुबाकरने गोल करत कॅमेरूनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या इतिहासात ब्राझीलविरुद्ध विजय मिळवणारा कॅमेरून हा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.