ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : मेस्सीकडे वर्ल्डकप जिंकण्याची शेवटची संधी, अंतिम सामन्यात गतविजेत्या फ्रान्सशी लढत - last chance for messi to win world cup

गतविजेता फ्रान्स आणि दोन वेळचा विजेता अर्जेंटिना (france vs argentina) या दोन संघात रविवारी (18 डिसेंबर) अंतिम सामना (FIFA World Cup 2022 final) रंगणार आहे. अर्जेंटिनाचा सुपरस्टार मेस्सीला (Lionel Messi) त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोपेक्षा (Cristiano Ronaldo) वरचढ ठरण्यासाठी ही शेवटची संधी आहे. (last chance for messi to win world cup)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 16, 2022, 8:40 PM IST

दोहा : अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) रविवारी विश्वचषकातील आपला दुसरा अंतिम सामना (FIFA World Cup 2022 final) खेळणार आहे. आठ वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात मेस्सीच्या अर्जेंटिनाला अंतिम सामन्यात जर्मनीकडून पराभव पत्कारावा लागला होता. मेस्सी आता त्याच्या शेवटच्या विश्वचषकात या जुन्या जखमांना भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्जेंटिनाने तीन दशकांहून अधिक काळापासून फिफा विश्वचषक जिंकलेला नाही. (FIFA World Cup 2022 final)

रोनाल्डोपेक्षा वरचढ होण्याची संधी : लुसेल स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या फायनल मॅचमध्ये फ्रान्सचा पराभव करून जेतेपद पटकावण्याचे मेस्सीचे स्वप्न आहे. त्याने आपल्या सुवर्ण कारकिर्दीत सर्व काही जिंकले आहे, मात्र विश्वचषकाने त्याला प्रत्येक वेळी हुलकावणी दिली आहे. मेस्सीने हा विश्वचषक जिंकला तर तो त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोपेक्षा निश्चतरित्या वरचढ ठरणार आहे. रोनाल्डोने देखील अद्याप विश्वचषक जिंकलेला नाही. 37 वर्षीय रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडल्याने त्याचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

डिएगो मॅराडोनानंतर मेस्सीचे नाव : अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी म्हणाले, "जेव्हाही आम्ही मेस्सीला खेळताना पाहतो तेव्हा तो आम्हाला विशेष वाटतो. त्याच्यात काहीतरी आहे ज्यामुळे केवळ अर्जेंटिनामध्येच नाही तर जगात सर्वत्र लोकांचा तो आवडता आहे. आम्ही भाग्यवान आहोत की तो आमच्या संघात आहे. अर्जेंटिनामध्ये डिएगो मॅराडोनानंतर मेस्सीचे नाव घेतले जाते. मात्र विश्वचषक जिंकल्यानंतर त्याचे नाव मॅराडोनाच्या बरोबरीने घेतले जाईल". मॅराडोनाने 1986 मध्ये मेक्सिकोमध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. या विश्वचषकात मेस्सीने व फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेच्या प्रत्येकी पाच गोल केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.