ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर आज ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान ; युएसए विरुद्ध नेदरलॅंडचे पारडे जड

युनायटेड स्टेट्स विरुद्धच्या सामन्यात नेदरलॅंड निश्चितच फेवरेट म्हणून उतरतील मात्र युएसएची उर्जा आणि आक्रमक प्रेसिंग शैली यामुळे त्यांना हलक्यात घेणे नेदरलॅंडला भारी पडू शकते. (Netherland vs USA). तर दुसरीकडे स्कालोनीच्या अर्जेंटिनाने पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतर स्पर्धेत स्वतःला सुधारले आहे. (Argentina vs Australia).

FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022
author img

By

Published : Dec 3, 2022, 4:12 PM IST

दोहा : फिफा विश्वचषकाच्या (FIFA World Cup 2022) बाद फेरीला आजपासून सुरुवात होत आहे. नेदरलँडचा पहिला सामना रात्री 8.30 वाजता अमेरिका विरुद्ध होणार आहे (Netherland vs USA) तर दुसरा सामना रात्री 12.30 वाजता अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. (Argentina vs Australia).

युएसए विरुद्ध नेदरलॅंडचे पारडे जड : मंगळवारी रात्री इराणविरुद्ध 1-0 च्या विजयात यूएसएचा कर्णधार ख्रिश्चन पुलित्सिकला मांडीची दुखापत झाली होती. त्यामुळे या सामन्यात त्याच्या खेळण्यावर संशय आहे. चेल्सीचा हा फॉरवर्ड यूएसएसाठी एक महत्त्वपूर्ण खेळाडू असून त्याची अनुपस्थिती संघाला निश्चितच महागाची पडू शकते. दुसरीकडे, नेदरलँड्सचा हुकमाचा खेळाडू मेम्फिस डिपे हा पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तर कोडी गॅकपोने आत्तापर्यंत तीन सामन्यात तीन गोल केले आहेत. लुई व्हॅन गालच्या प्रशिक्षणाखाली नेदरलॅंडचा संघ कतारमध्ये आतापर्यंत त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. सेनेगलला पराभूत करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला तर इक्वाडोरविरुद्ध त्यांचा सामना अनिर्णित राहिला. युनायटेड स्टेट्स विरुद्धच्या या सामन्यात ते निश्चितच फेवरेट म्हणून उतरतील मात्र युएसएची उर्जा आणि आक्रमक प्रेसिंग शैली यामुळे त्यांना हलक्यात घेणे नेदरलॅंडला भारी पडू शकते.

मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान : अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी म्हणाले की, विश्वचषकात प्रत्येक संघ मजबूत आहे. स्कालोनीच्या संघाने पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतर स्पर्धेत स्वतःला सुधारले. पोलंडविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये एन्झो फर्नांडीझ आणि ज्युलियन अल्वारेझ यांना स्थान दिल्याने संघाचा योग्य समतोल साधल्या गेला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात फ्रान्सकडून 4-1 ने पराभव झाल्यानंतर स्वत:ला सावरले व त्यानंतर ट्युनिशिया आणि डेन्मार्कला 1-0 ने पराभूत करत बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. मॅथ्यू लेकी याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाचे नेतृत्व असेल तर सेंट्र बॅक हॅरी सौटर, जो इंग्लंडच्या स्टोक सिटी क्लब कडून खेळतो तो देखील कतारमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.