ETV Bharat / sports

Exclusive Interview: रिओमधील अपयशानंतर टोकियोत पदक जिंकायचेच हे वचन स्वत:ला दिलं होतं - मीराबाई चानू - टोकियो ऑलिम्पिक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग खेळात रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूशी ईटीव्ही भारतने खास बातचित केली.

EXCLUSIVE interview of mirabai chanu
Exclusive Interview: रिओमधील अपयशानंतर टोकियोत पदक जिंकायचेच हे वचन स्वत:ला दिलं होतं - मीराबाई चानू
author img

By

Published : Jul 30, 2021, 5:12 PM IST

मुंबई - रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू क्लीन अॅण्ड जर्कमध्ये वजन उचलू शकली नाही. यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. परंतु ती खचली नाही. तिने कठोर सराव करत टोकियो ऑलिम्पिक गाठलं आणि रौप्य पदक जिंकलं. मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाचे खाते उघडले. तिने 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत ही कामगिरी केली आणि तिने स्वत:ला दिलेले वचन पूर्ण केलं. अशा हरहुन्नरी खेळाडूशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. या बातचितमध्ये मीराबाई चानूने दिलखुलास उत्तरे दिली.

  • प्रश्न: ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून भारतात परतल्यानंतर तुझा अनुभव कसा होता?

उत्तर: (हसत...) मला खूप आनंद वाटत आहे. मला खूप सारं प्रेम मिळालं. जेव्हा मी भारतात पोहोचले. तेव्हा भारतीयांनी मला भरभरून प्रेम दिलं. याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही.

  • प्रश्न: ...आणि पिझ्झा खाल्लास का?

उत्तर: होय, मी पिझ्झा खाल्ला. भारतात आले तेव्हापासून मी पिझ्झाच खात आहे. आतापर्यंत इतके पिझ्झा खाल्ले आहेत की, हे जरा जास्तच होत असल्याची मला भीती वाटत आहे.

  • प्रश्न: रिओ ऑलिम्पिकमधील अपयशानंतर स्व:तला कसं सावरलं?

उत्तर: रिओ हे माझ पहिलं ऑलिम्पिक होतं. यासाठी मी कठोर मेहनत घेतलेली होती. मला कल्पना होती की, या ऑलिम्पिकमध्ये मला पदक जिंकण्याची संधी आहे. रिओसाठी मी ट्रायल दिली होती. तेव्ही मी सहज वजन उतलेले होते. तेवढेच वजन मी जर ऑलिम्पिकमध्ये उचलले असते तर रौप्य पदक तेव्हाच आला असता. पण त्या दिवशी मला नशिबाची साथ नव्हती. त्यामुळेच त्या दिवशी मला पदक जिंकता आलं नाही.

मला खूप दुख झालं. मला कळत नव्हतं की, इतकी मेहनत घेऊन माझ्यासोबत हे काय होत आहे. मी काही दिवस याचा विचार करत उपाशी राहिले. तेव्हा माझ्या प्रशिक्षकांनी मला समजावलं. घरच्यांनी देखील धीर दिला. तेव्हा मी स्वत:ला एक वचन दिलं होतं की, टोकियोमध्ये पदक आणायचचं. यासाठी मी खूप मेहनत करेन. मी माझ्या सराव आणि टेक्निकमध्ये काही बदल केले. ज्यामुळे मी लवकरच फ्लो मध्ये परतले. जी कामगिरी मी ऑलिम्पिकध्ये करु शकले नाही, ती मी जागतिक चॅम्पियनशीमध्ये केली.

EXCLUSIVE interview of mirabai chanu
मीराबाई चानू
  • प्रश्न: लॉकडाउनमध्ये सरावादरम्यान, तुला दुखापत झाली होती, यातून कसं सावरलंसं?

उत्तर: दोन महिन्यापर्यंत मी सराव करु शकले नाही. खूप काळ विश्रांती झाली होती आणि वेटलिफ्टिंग असा खेळ आहे, जो सतत सराव केल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जर एक दिवस सराव करू शकला नाही तर, तुम्ही एक आठवड्याने मागे जालं. 2 महिने वेटलिफ्टिंगपासून लांब राहणे हे खूप कठिण होतं. माझ शरीर खूप स्थूल झालं होतं. तेव्हा मी पटियालामध्ये होते. मी सरावासाठी आग्रह केला. पण मला 2 महिन्याने याची संधी मिळाली. अचानक सरावाला सुरूवात झाल्याने माझ्याकडून काहीच होत नव्हतं. तेव्हा ऑलिम्पिकची पात्रता फेरी जवळ होती. हा काळ खूप कठिण होता.

  • प्रश्न: जेव्हा तू खूप काळ घरापासून लांब राहिली. यात तुला खूप कष्ट सहन करावे लागले. पदक जिंकण्यासाठी तुझा सर्वात मोठा त्याग कोणता आहे?

उत्तर: (हसली...) वर्ष 2016 मला आठवतं, मी जेव्हा विश्व चॅम्पियन बनले. त्यावेळी माझ्या बहिणीचे लग्न होते. त्या लग्नाला मी जाऊ शकले नाही. त्या स्पर्धेदरम्यान, मी फोनचा वापरण बंद केलं. वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी काही करण्याची माझी तडफड होती. यामुळे मी माझ्या बहिणीच्या लग्नाला जाऊ शकले नाही आणि माझ्या आवडत्या खाण्याच्या पदार्थांचा मी त्याग केला. मी कोणत्याही पार्टीला जात नव्हते. त्यावेळी सर्व लक्ष्य स्पर्धेवर केंद्रित केलं होतं.

EXCLUSIVE interview of mirabai chanu
मीराबाई चानू
  • प्रश्न: ऑलिम्पिक पदक तर जिंकलं पुढचा प्लॅन काय आहे.

उत्तर: कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई गेम्स आहेत. नंतर पॅरिससाठी मेहनत घेईन. आता रौप्य पदक मिळालं आहे. पॅरिसमध्ये याचं रुपांतर सुवर्णपदकात करेन.

प्रश्न: पदकाचा जल्लोष कसा साजरा करणार आहेस?

उत्तर: मी माझ्या कुटुंबियासोबत आहे. मज्जा करत आहे. मला अनेक लोक भेटायला येत आहेत. मी सर्वांशी बोलत आहे. हे सर्व पुढील काही दिवस चालेल. नंतर मी ट्रेनिंगसाठी रवाना होईन.

हेही वाचा - Tokyo Olympic : शाब्बाश पोरी! लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत; भारताचे पदक पक्के

हेही वाचा - Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधू रोमहर्षक विजयासह उपांत्य फेरीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.