नवी दिल्ली - भारताची माजी धावपटू पी.टी. उषाला एक मोठा सन्मान मिळाला आहे. पी.टी. उषाची एशियाई एथलेटिक्स संघाच्या (एएए) सदस्यपदी निवड झाली आहे. सहा सदस्यांच्या बैठकीत आता पी.टी उषाला स्थान मिळाले आहे.
१९९२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हातोडा फेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले आंद्रे अबदुवलीयेव हे या संघाचे प्रमुख असतील. आंद्रे अबदुवलीयेव हे उझबेकिस्तान देशाचे आहेत. पी.टी. उषाने आपले नियुक्तीचे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. 'मी तुमची आभारी आहे. एएएची सदस्य होणे हा अविश्वसनीय सन्मान आहे', असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
It is an incredible honour to be part of the Member of Athletes Commission of the Asian Athletic Association. I express my sincere gratitude! 🙏 pic.twitter.com/rAGkMkrvBh
— P.T. USHA (@PTUshaOfficial) August 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">It is an incredible honour to be part of the Member of Athletes Commission of the Asian Athletic Association. I express my sincere gratitude! 🙏 pic.twitter.com/rAGkMkrvBh
— P.T. USHA (@PTUshaOfficial) August 13, 2019It is an incredible honour to be part of the Member of Athletes Commission of the Asian Athletic Association. I express my sincere gratitude! 🙏 pic.twitter.com/rAGkMkrvBh
— P.T. USHA (@PTUshaOfficial) August 13, 2019
एएएचे महासचिव ए. शुगुमरन यांनी या पत्रात म्हटले की, 'मला विश्वास आहे की, तुम्ही तुमच्याबरोबर ज्ञान आणि घेऊन याल. आणि आशियातील खेळाडूंच्या विकास आणि यशासाठी नेहमी तत्परता दाखवाल.'
आयोगाच्या इतर सदस्यांमध्ये चीनची वांग यू, कजाकिस्तानची ओल्गा राइपाकोवा, मलेशियाची ली हुप वेइ सौदी अरबचे साद शादाद हे देखील सामिल आहेत.